घरापासून हाकेच्या अंतरावरच काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:38 IST2020-02-20T12:38:05+5:302020-02-20T12:38:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : घरापासून हाकेच्या अंतरावरच कारचा अपघात होऊन अक्कलकुवा पंचायत समितीचे तालुका समन्वयक बिपीन नाईक यांचा ...

Insert black only within walking distance of home | घरापासून हाकेच्या अंतरावरच काळाचा घाला

घरापासून हाकेच्या अंतरावरच काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : घरापासून हाकेच्या अंतरावरच कारचा अपघात होऊन अक्कलकुवा पंचायत समितीचे तालुका समन्वयक बिपीन नाईक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले एकजण गंभीर जखमी झाले आहेत. वाण्याविहिर येथे १८ रोजी रात्री ही घटना घडली.
बिपीन रामदास नाईक, (३५) रा.वाण्याविहिर हे कन्हैयालाल ईश्वर वळवी यांच्यासोबत नंदुरबार येथे जिल्हा परिषदेत कामानिमित्त गेले होते. रात्री ते वाण्याविहिर येथे परत आले. गावात आल्यावर घरापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर शासकीय वसतिगृहाजवळ त्यांची कार (एमएच ३९-एबी ५६२२) अचानक उलटली. या अपघातात बिपीन नाईक यांना गंभीर मार लागला. त्यांना व कन्हैयालाल वळवी यांना तातडीने अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बिपीन नाईक यांना मयत घोषीत केले तर कन्हैयालाल वळवी यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अक्लककुवा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर तपास करीत आहे.

Web Title: Insert black only within walking distance of home