शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ांच्या वास्तव्यामुळे शेतीकामांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील पिंगाणे  येथील तिखोरा रस्त्यावर असलेल्या माधव जंगू पाटील यांच्या शेतात मादी बिबटय़ा व ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील पिंगाणे  येथील तिखोरा रस्त्यावर असलेल्या माधव जंगू पाटील यांच्या शेतात मादी बिबटय़ा व त्याच्या चार बछडय़ांचे गेल्या काही दिवसापासून वास्तव्य आढळून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीकामे ठप्प झाली आहेत. वनविभागाने बिबटय़ांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.तालुक्यातील गोगापूर, रायखेड, खेडदिगर, अवगे-जुनवणे, औरंगपूर परिसरात बिबटय़ाचे वास्तव्य आढळून येत आहे. पिंगाणे-धुरखेडा दरम्यान पं.स.चे माजी सभापती          माधव जंगू पाटील यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून मादी बिबटय़ा व त्याची चार बछडे यांचे वास्तव्य असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गेल्या महिन्यात दुधखेडा रस्त्यावर दोन बिबटे मोकाट फिरत असल्याचे चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर दिवसाही शेतात जाण्यास घाबरत होते. या भागात महिनाभरापासून पाऊस सुरू होता म्हणून शेतातील पिकांमध्ये भरमसाठ तण वाढले आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिकांच्या आंतरमशागतीची कामे आटोपण्यासाठी धावपळ करीत आहेत. मात्र बिबटय़ांच्या वास्तव्यामुळे शेतमजूर कामे करण्यासाठी येत नाहीत. परिणामी शेतीकामे ठप्प झाली असून वनविभागाने या बिबटय़ांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.