शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नवसंजीवनी योजनेसाठी कृती आराखडे पाठविण्याबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

सातपुड्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेला रोजगार, चांगला पोषण आहार, आरोग्य सेवा, दळणवळण सुविधा, शुध्द पिण्याचे पाणी, धान्य ...

सातपुड्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेला रोजगार, चांगला पोषण आहार, आरोग्य सेवा, दळणवळण सुविधा, शुध्द पिण्याचे पाणी, धान्य पुरवठा, खावटी कर्ज आदी शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांचा विकास करण्यासाठी शासनाने सन १९९५ मध्ये नवसंजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेत अक्कलकुवा, धडगाव व तळोदा या तीन तालुक्यातील आदिवासी गावे योजनेत घेण्यात आली आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दरवर्षी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सबंधित यंत्रणांकडून कामांचा कृती आराखडा मगविला जात असतो. त्यानंतर तो आराखडा शासनाला सादर केला जातो. तथापि, याबाबत यंत्रणांकडून सातत्याने उदासीन भूमिका घेतली जात असते. कारण गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उशिरा कृती आराखडा सादर करण्याचे पत्र यंत्रणांना दिले होते. त्या उपरातही काही यंत्रणांनी प्रकल्पाच्या पत्राला केराची टोपली दाखवत आपल्या विभागाचा अहवाल पाठवला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्रकल्प प्रशासनाने नंदुरबार जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी (नंदुरबार), कार्यकारी अभियंता जि.प. नंदुरबार, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा (जि.प. नंदुरबार), शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक (नंदुरबार), उपजिल्हाधिकारी रोहयो (नंदुरबार), जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जि.प. नंदुरबार, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नंदुरबार, मनरेगा जि.प. नंदुरबार, आदिवासी विकास महामंडळ नंदुरबार अशा १३ यंत्रणांना पत्र पाठवून आपला कृती आराखडा ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु यातील काही यंत्रणांनीच प्रकल्पाकडे कृती आराखडा सादर केला होता. यावरून विभाग प्रमुखांची आदिवासींच्या विकास योजनांची संवेदनशीलता दिसून येते. वास्तविक आदिवासी विकास प्रकल्पाकडे यंत्रणांकडून आलेल्या आरखड्यानंतरच तो शासनास सादर केला जात असतो. मात्र आराखडाच आला नसल्यामुळे प्रशासनालाही सादर करता आला नाही. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. तर दुसरीकडे यंत्रणाच त्याला हरताळ फासण्याचे काम करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे कृती आराखडा न पाठवणाऱ्या यंत्रणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी जनतेने केली आहे.

शासनाच्या नवसंजीवनी योजनेत घेण्यात आलेल्या तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील गावांच्या कामांचा कृती आराखडा सादर करण्याची कार्यवाही सुरू असून आराखडेदेखील झाले आहेत. उर्वरितदेखील लवकरच जमा केले जाणार आहेत.

-निर्मल तोरवणे, सहायक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा

नंदुरबारसारख्या जिल्ह्यात ज्यात बालमृत्यू व मातामृत्यू यांचे प्रमाण जास्त आहे. अशा जिल्ह्यात २०२०-२१ चा आराखडा इतक्या उशिरा तयार होणं हे अतिशय गंभीर आहे. नवसंजीवनी व गाभा समितीत नियोजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे. कृती आराखडाच न बनणे म्हणजे नियोजनाचा अभाव व पर्यायी अंमलबजावणीचाही अभाव आहे. पुढच्या म्हणजेच २०२१-२२ यावर्षी तरी वेळेत नियोजन होऊन अंमलबजावणी होईल ही अपेक्षा.

-लतिका राजपूत, नर्मदा बचाओ आंदोलन, धडगाव व अशासकीय सदस्य जिल्हा व राज्य गाभा समिती