शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टरबूज विक्रीतून वाढताेय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

अनलाॅकबाबत ग्रामीण भागात उत्सुकता रांझणी : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेकजण १ जूननंतरच्या अनलाॅकबाबत उत्सुकतेने माहिती घेत आहेत. तालुक्यात ...

अनलाॅकबाबत ग्रामीण भागात उत्सुकता

रांझणी : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेकजण १ जूननंतरच्या अनलाॅकबाबत उत्सुकतेने माहिती घेत आहेत. तालुक्यात १ जूननंतर विवाह सोहळे व घरगुती कार्यक्रम असल्याने पुढे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामस्थ आतापासून नियोजन करत आहेत.

खत व बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठच

बोरद : यंदा केंद्र शासनाने खतांच्या दरांमध्ये वाढ केली आहे. यातून तळोदा आणि बोरद येथील खत व बियाणे विक्रीच्या दुकानांमध्ये शुकशुकाट आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांचे रब्बी उत्पादन बाजारात विक्री होऊ शकले नाही. उत्पादन चांगले आले असले तरीही त्याला चांगला भाव मिळाला नाही, परिणामी खत व बियाणे खरेदीबाबत शेतकरी अद्याप तरी अनुत्सुक आहेत.

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती कामांची गरज

धडगाव : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थाने यांच्या दुरुस्त्या करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच ठिकाणी दुरुस्त्या गरजेच्या आहेत.

लसींचा पुरवठा करण्याची मागणी

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागात पावसाळ्यात सर्पदंशांने मृत्यू ओढावण्याच्या अनेक घटना घडतात. यातून दुर्गम भागातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी त्या त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसींचा साठा करण्याची मागणी होत आहे.

दुर्गम भागात घर दुरुस्तीच्या कामांना वेग

मोलगी : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी घरदुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. यात घरांवरची काैले दुरुस्ती करण्यासह त्यावर प्लॅस्टिक टाकण्याची लगबग सुरू आहे. पावसाळ्यात पावसाचा जोर अधिक असल्याने छत मजबुतीवर भर देण्यात येत आहे. यासाठी अनेक ठिकाणी लाकडाच्या नवीन दांड्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

हिंस्त्र प्राण्यांचा संचार पुन्हा वाढला

बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा संचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी शेतशिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या व अस्वलांच्या पावलांचे ठसे आढळून येत आहेत. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

अक्कलकुवा शहरात बेशिस्त कायम

अक्कलकुवा : शहरातील बाजारपेठेत दररोज सकाळी नागरिक गर्दी करून नियमांचा भंग करत आहेत. दुकानांमध्ये वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती आहे. पोलिसांकडून समज देऊनही बेशिस्त कायम आहे.

खोदकामामुळे अपघात वाढले

नंदुरबार : शहरातील जयचंद नगरात जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी केलेल्या खोदकामावर पुन्हा खड्डा करून पाइपलाइन दुरुस्तीचे काम करण्यात आले. यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहे. याठिकाणी योग्य पद्धतीने दुरुस्तीची गरज आहे.

ग्रामीण भागातील मद्यविक्री वाढली

नंदुरबार : तालुक्याच्या विविध भागात गावठी दारूच्या विक्रीत वाढ झाली आहे. सायंकाळच्या वेळी गावोगावी अवैध गावठी दारू विक्री सुरू असून, याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी आहे. दारूमुळे अनेक ठिकाणी वादही होत आहेत.