शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाढीने आरोग्य सेवेचा ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लवकरच २० हजाराचा टप्पा पूर्ण करणार आहे. दर दिवशी वाढत असलेल्या रुग्णांना बेड ...

नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लवकरच २० हजाराचा टप्पा पूर्ण करणार आहे. दर दिवशी वाढत असलेल्या रुग्णांना बेड देणे मिळणे अशक्य होत असताना नवीन कोरोनाबाधितांना सेवा देताना आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. एकट्या जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ १३२ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णांच्या संख्येनुसार ही संख्या २५० पेक्षा अधिक असायला हवी असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात आजअखेरीस १८ हजार रूग्ण समोर आले आहेत. यातील १२ हजार कोरोनामुक्त आहेत. सध्या जिल्ह्यात ५ हजार ६५५ कोरोना रुग्ण आहेत. आजवरचा हा सर्वोच्च आकडा आहे. यातील मुक्त झालेल्यांना सातत्याने घरी सोडले जात असले तरी जिल्हा रुग्णालयातील १४० रूग्णांची क्षमता असतानाही याठिकाणी २०५ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य विभाग बेड मॅनेजमेंटसाठी लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच क्वारंटाईन करुन गोळ्या औषधी देत त्यांना बरे करत असल्याची माहिती आहे. सध्या होम आयासोलेशमध्ये असलेल्यांची संख्या ही केवळ ११८ एवढीच आहे. यात नंदुरबार ५२, शहादा ३८, तळोदा १५, तर नवापूर तालुक्यात १३ जण होमक्वारंटाईन आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात शासकीय व खाजगी रुग्णाालये मिळून ८०४ बेड आहेत. यातील १०३ ह्या रिकाम्या असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तर तीन सीसीसी सेंटरमध्ये ४५० बेड तयार करण्यात आले असून २६१ रुग्ण त्याठिकाणी दाखल असून १८९ बेड हे रिक्त आहेत. रुग्णालये आणि सीसीसी सेंटर यांच्या एकत्रित ९६२ खाटांपैकी ७०१ बेडवर रुग्ण आहेत. यात होमक्वारंटाईन ११८ असले तरीही उर्वरित साडेचार हजार ॲक्टीव्ह रुग्णांचे काय, असा प्रश्न उपस्थित होते. एकीकडे ही स्थिती असतानाही गंभीर रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून या रुग्णांना सेवा देण्यासाठी बोटावर मोजण्याएवढेच वैद्यकीय अधिकारी मात्र जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात एमबीबीएस चार तर बीएचएमएस झालेले चार वैद्यकीय अधिकारीच कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयात २०० रुग्णांची देखभाल करण्यासाठी १३२ कर्मचारी सध्या कार्यरत असले तरी यात केवळ आठच डाॅक्टर आहेत. नगण्य असलेल्या प्रशिक्षित वैद्यकीय अधिका-यांच्या संख्येमुळे रुग्णसेवेचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

यात कोरोना रुग्णालयात ड्यूटी करण्यासाठी ऑर्डर काढूनही अनेकजण येत नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनीच या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देत कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.