महिला सक्षमीकरणासह मनोधैर्यातही वाढ-सीईओ गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:03+5:302021-03-15T04:28:03+5:30

या कार्यशाळेस समाजकल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, उमेदचे सह-जिल्हा अभियान संचालक, तथा ...

Increase in morale along with women empowerment-CEO Gawde | महिला सक्षमीकरणासह मनोधैर्यातही वाढ-सीईओ गावडे

महिला सक्षमीकरणासह मनोधैर्यातही वाढ-सीईओ गावडे

या कार्यशाळेस समाजकल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, उमेदचे सह-जिल्हा अभियान संचालक, तथा प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी डॉ.वर्षा पडोळ, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर उपस्थित होते. उमेद अभियानाची नंदुरबार जिल्ह्यातील वाटचाल, तसेच विविध समुदाय संस्थांना सुरू असलेले कामकाज, त्यांना वितरित निधीबाबत यशवंत ठाकूर यांनी माहिती दिली. समूहांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी त्यांना वेळोवेळी अर्थसाहाय्य करणारे अशा उत्कृष्ट बँक असलेले महाराष्ट्र ग्रामीण बँक-शनिमांडळ, बँक ऑफ बडोदा-खांडबारा, स्टेट बँक ऑफ इंडिया विसरवाडी, बँक ऑफ बडोदा-पुरुषोत्तमनगर, एचडीएफसी बँक शहादा यांच्या शाखा व्यवस्थापकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच अक्कलकुवा, शहादा व तळोदा तालुक्यातील नऊ सखींना मान्यवरांच्या हस्ते बायोमेट्रिक उपकरण वाटप करण्यात आले.

यावेळी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, उमेद अभियानांतर्गत दशसूत्रीच्या माध्यमातून केवळ आर्थिकच नव्हे, तर महिलांचे मनोधेर्यही उंचावले आहे. गावाच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. कृतीसंगमाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उमेद अभियान कटिबद्ध असून, त्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावरील यंत्रणा कार्यरत आहे. कार्यशाळेच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आवारात नंदुरबार व शहादा तालुक्यातील उत्पादक समूहांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षातील उमेश अहिरराव व चंद्रकांत चावरे यांनी परिश्रम घेतले, तसेच नंदुरबार व तळोदा तालुक्यातील प्रभाग समन्वयकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक प्रेरणा केदार व पूजा जाधव यांनी केले, तर आभार प्रदीप लाटे यांनी मानले.

Web Title: Increase in morale along with women empowerment-CEO Gawde