मुख्यमंत्र्याच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन व पालिका इमारत भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:09 IST2020-02-12T12:08:45+5:302020-02-12T12:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पालिकेने तयार केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे १५ ...

Inauguration of Swimming Pool and Palm Building by Chief Minister | मुख्यमंत्र्याच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन व पालिका इमारत भूमिपूजन

मुख्यमंत्र्याच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन व पालिका इमारत भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पालिकेने तयार केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे १५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे़ यादरम्यान पालिकेच्या प्रस्तावित नव्या इमारत बांधकामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली़
१५ फेब्रुवारी रोजीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी त्यांनी सांगितले की, नंदुरबार पालिकेच्या दोन कोटी २० लाख रुपये खर्चाच्या पालिका जलतरण तलावाचे काम पूर्ण झाले आहे़ हा तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे़ या तलावाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे़ या तलावाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री यांना निमंत्रण दिले होते़ त्यांनी ते स्विकार केले आहे़ दरम्यान जुन्या कोर्टाच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री यांच्याहस्ते होणार आहे़ तीन कोटी रुपयांच्या या बांधकामाला शासनाकडून मंजूरी देण्यात आले आहे़
पुढे रघुवंशी यांनी सांगितले की, १५ रोजी सकाळी १०़३० वाजता मुख्यमंत्री हे शहरात येणार आहेत़ दोन्ही ठिकाणी कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर जी़टी़पी महाविद्यालय प्रांगणात त्यांची जाहिर सभा आणि नंदुरबार नगरपालिका आणि नागरिकांच्यावतीने जाहिर नागरी सत्कार होणार आहे़ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी राहतील़ तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार संजय राऊत, मंत्री दादा भुसे, धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय प्रमुखांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे़
शेवटी चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौºयादरम्यान जिल्ह्यातील आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रात प्रलंबित असलेली विकास कामांची माहिती देणार आहे़ यात प्रामुख्याने तापी बुराई उपसा सिंचन योजना, २२ उपसा सिंचन योजना, भालेरची एमआयडीसी यासह नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील बिगर आदिवासी क्षेत्रात गणल्या जाणाºया आदिवासी बांधवांंच्या समस्या मांडणार असल्याची माहिती दिली़ पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ़ विक्रांत मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़

Web Title: Inauguration of Swimming Pool and Palm Building by Chief Minister