शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ, पालकमंत्र्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST

यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी महासंचालक तथा राज्य शासनाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ ...

यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी महासंचालक तथा राज्य शासनाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी बोलता पालकमंत्री पाडवी म्हणाले, देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे.

लसीकरणाच्या साहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने, आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

...असे सुरू झाले लसीकरण

लसीकरणाच्या वेळी कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राला कर्मचाऱ्यांनी फुले आणि रंगीत फुग्यांनी सजविले होते. को-विन ॲपवरील नोंदणीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना लस देण्यात येत आली. लसीकरणानंतर ॲपवर लसीकरण झाल्याची नोंदही घेण्यात आली. लसीकरणानंतर कर्मचाऱ्यांना ३० मिनिटे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. पालकमंत्र्यांनी प्रतिक्षा कक्षातील कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी निरीक्षण कक्षात लसीकरण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

जिल्हा रुग्णालयासह अक्कलकुवा आणि म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही लसीकरणास सुरुवात झाली. या चारही केंद्रांवर दररोज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी अक्कलकुवा येथे ७५ कुप्या (७५० डोस), म्हसावद १७० (१७०० डोस), नवापूर ८५ (८५० डोस) आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीच्या १२० कुप्या (१,२०० डोस) शितपेटीत ठेवण्यात आल्या आहेत.