अत्याचार करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:39 IST2020-03-18T12:39:32+5:302020-03-18T12:39:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाटीबेडकी ता़ नवापुर येथे युवतीवर अत्याचार करणाºयास नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे कारावासाची ...

Imprisonment for the perpetrator | अत्याचार करणाऱ्यास कारावास

अत्याचार करणाऱ्यास कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाटीबेडकी ता़ नवापुर येथे युवतीवर अत्याचार करणाºयास नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ नोव्हेंबर २०१७ मध्ये ही घटना घडली होती़
सोमनाथ ठाकूर गावीत असे आरोपीचे नाव आहे़ आरोपी सोमनाथ याने नोव्हेंबर २०१७ मध्ये पाटीबेडकी येथील घरी एकट्या असलेल्या युवतीच्या घरात बळजबरीने शिरुन तिच्यावर अत्याचार केला होता़ त्याने युवतीला चाकूचा धाक दाखवत हे कृत्य केले़ पिडितेच्या भावाने हा प्रकार बघितल्यानंतर ग्रामस्थांनी सोमनाथ यास जाब विचारला होता़ त्यावेळी त्याने युवतीसोबत विवाह करणार असल्याचे सांगितले होते़ यातून पंचायत बोलावूनही तो तेथे आला नव्हता़ यातून आरोपी सोमनाथ विरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ जिल्हा न्यायालयात पोली उपनिरीक्षक देविदास बिºहाडे यांनी दोषारोपत्र सादर केल्यानंतर न्यायमूर्ती प्रमोद तरारे यांच्या न्यायालयात खटला सुरु होता़ न्यायालयाने साक्षीपुरावे तपासल्यावर सोमनाथ हा दोषी आढळल्याने त्याला सात वर्षे कारावास व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ तुषार कापडिया यांनी काम पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक नितीन साबळे व गिरीष पाटील यांनी कामकाज केले़

Web Title: Imprisonment for the perpetrator