नंदुरबारात भर बाजारात अवैध दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:07 IST2020-05-14T10:06:52+5:302020-05-14T10:07:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील मंगळबाजारातील एका शितपेय हॉटेलच्या बाजूला अवैध दारू विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी रंगेहात पकडले. ...

 Illegal sale of liquor in Nandurbar market | नंदुरबारात भर बाजारात अवैध दारू विक्री

नंदुरबारात भर बाजारात अवैध दारू विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील मंगळबाजारातील एका शितपेय हॉटेलच्या बाजूला अवैध दारू विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडू २,१९० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
मंगळ बाजारातील एका दुकानाच्या आडोशाला मन्सूरी अयाझ नेहाल, आझाद लस्सीवाला हा अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री आठ वाजता त्या ठिकाणी जावून धाड टाकली असता नेहाल याच्याकडे विदेशी दारूच्या १५ बाटल्या मिळून आल्या. त्यांची किंमत २, १९० रुपये इतकी आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी श्रीकांत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मन्सूरी अयाझ नेहाल याच्याविरुद्ध दारूबंदी कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक ईशी करीत आहे. दरम्यान, या भागात विक्री होणाºया अवैध दारूबाबत नेहमीच तक्रारी होत होत्या.

Web Title:  Illegal sale of liquor in Nandurbar market