खांडबारा येथे अवैध दारू विक्री, एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST2021-06-22T04:20:57+5:302021-06-22T04:20:57+5:30

पोलीस सूत्रांनुसार खांडबारा येथे मेन बाजार गल्लीत एक व्यक्ती देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विसरवाडी ...

Illegal sale of liquor at Khandbara, crime against one | खांडबारा येथे अवैध दारू विक्री, एकाविरुद्ध गुन्हा

खांडबारा येथे अवैध दारू विक्री, एकाविरुद्ध गुन्हा

पोलीस सूत्रांनुसार खांडबारा येथे मेन बाजार गल्लीत एक व्यक्ती देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, मुकेश कांतिलाल पाटील (रा. कुंभार गल्ली, खांडबारा) हा देशी दारूची विक्री करताना आढळला. त्याच्याकडे देशी दारूच्या ४४५ बाटल्या असलेली दहा खोकी आढळून आली. त्याची किंमत २६ हजार ३९६ रुपये अशी आहे. या खोक्यांमध्ये देशी दारू टँगो पंच, सुगंधी संत्रा, महाराजा संत्रा याप्रकारच्या बाटल्या आढळून आल्यात. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, हवालदार पिंटू पावरा, देवेंद्र हिरे, राजू कोकणी यांच्या पथकाने केली.

विसरवाडी पोलीस ठाण्यात पिंटू पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश कांतिलाल पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.

Web Title: Illegal sale of liquor at Khandbara, crime against one