शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पुलाजवळ अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 12:17 IST

   लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पुलाजवळ जेसीबीने टेकडी फोडून अवैधरित्या गौणखनिज काढले जात आहे. ...

   लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पुलाजवळ जेसीबीने टेकडी फोडून अवैधरित्या गौणखनिज काढले जात आहे. हे गौणखनिज मशिनरीने काढले जात असल्याने मोठ्या प्रमाणात कंपन होतो. त्यामुळे पूल व बॅरेजला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गौणखनिज काढल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून उत्तरेकडील भागात शेतात तापी नदीचे पाणी घुसून शेतपिकांचे नुकसान होणार आहे. महसूल विभागाने येथे होणारा अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा बंद करून संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाच्या पायथ्याशी व बॅरेजपासून अवघ्या काही अंतरावरच अवैधरित्या जेसीबीद्वारे टेकडीचे खोदकाम करून  गौणखनिजाची बेसुमार वाहतूक सुरू आहे. वास्तविक नदीलगत, पुलालगत व बॅरेजलगत असे खोदकाम करता येत नाही, हा प्रकार नियमबाह्य असून त्यामुळे बॅरेज व पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. नदीलगत ही टेकडी असल्याने उत्तरेकडील शेतांमध्ये नदीचे पाणी शिर नाही. त्यामुळे पिकांचे एकप्रकारे संरक्षण होते.  मात्र काही ठेकेदारांनी त्यांनी घेतलेल्या रस्ते व    इतर कामांसाठी परवानगी न घेता जेसीबीद्वारे थेट खोदकाम करून डंपरच्या डंपर भरून गौणखनिज उपसण्याचे उद्योग सुरू केले आहेत.   तापी नदीला पूर आला तर पाणी थेट उत्तरेकडील भागातील शेतात शिरुन शेतपिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होईल यात कोणतीही शंका नाही. गौणखनिज काढण्याआधी महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर संबंधित ठेकेदार कुठून गौणखनिज घेणार आहे याची नोंद केली जाते. गौणखनिजाची परवानगी देताना महसूल विभाग गौणखनिज काढल्यानंतर नुकसान होणार नाही याची पाहणी करुनच परवानगी देऊन तशा सूचनाही संबंधितांना देण्यात येतात. मात्र प्रकाशा येथे वेगळाच प्रकार सुरू आहे. याविषयी प्रकाशा येथील तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गौणखनिजासाठी आता कोणालाही परवानगी दिलेली नाही, असे सांगितले. मग प्रकाशा येथील तापी नदीजवळ गौणखनिज का काढले जात आहे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. जर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर मातीचा भराव करायचा असेल तर त्यांना रॉयल्टी भरावी लागते. रॉयल्टी भरली नाही तर दंडात्मक कारवाई केली जाते. मग  येथे अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा करणाऱ्यांवर का कारवाई केली जात नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात असून येथून अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा करणाऱ्यांचा महसूल विभागाने शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चौकशीची मागणीकोळदा ते सेंधवा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम अपूर्ण आहे अशा ठिकाणी भरावाचे काम सुरू आहे. तसेच प्रकाशा ते तोरणमाळ रस्त्याचेही  काम सुरू आहे. या रस्त्यावर मातीचा भराव करण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी ही टेकडी फोडण्याचे काम सुरू असल्याचे समजते. दोन्ही ठेकेदारांपैकी  गौणखनिजाचा उपसा कोण करीत आहे याचा संबंधित विभागाने शोध घ्यावा. की या दोन्हींपैकी अजून तिसरा कोणी आहे याचा तपास करून तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. परवानगी दिली असेल तर जवळच पूल व बॅरेजला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच टेकडीमुळे शेतपिकांचे नदीतील पाण्यापासून होणारे संरक्षण हे मुद्दे संबंधित विभागाने विचारात का घेतले नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महसूल विभागाने भविष्यातील धोके व होणारे नुकसान लक्षात घेऊन येथे होणारा गौणखनिजाचा उपसा बंद करण्याची मागणी होत आहे.