शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

अपघात होऊन कठड्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST

निवारे अतिक्रमणात नंदुरबार : तालुक्यातील गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासीमार्ग निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींच्या निधीतून कधीकाळी उभारलेले ...

निवारे अतिक्रमणात

नंदुरबार : तालुक्यातील गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासीमार्ग निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींच्या निधीतून कधीकाळी उभारलेले हे निवारे शासकीय इमारती असताना त्याठिकाणी खासगी अतिक्रमण होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

दुर्गम भागात बसेस वाढीकडे दुर्लक्ष

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि मोलगी परिसरात सपाटीच्या तालुक्यातून बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. बसेस नसल्याने या भागातून प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

ऊस वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता

नंदुरबार : धुळे जिल्ह्यातील काही भागात लागवड केलेल्या उसाची वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील कारखान्यांपर्यंत येणाऱ्या उसाची वाहतूक करणारे वाहतूकदार नियमांचा भंग करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

सेंद्रिय भाजीपाल्याची विक्री वाढली

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात पिकवला जाणारा भाजीपाला शहरातील नागरिकांची पसंती ठरत आहे. यातही रनाळे ते नंदुरबार व कोळदे ते नंदुरबार दरम्यान काही जण रस्त्यावर भाजीपाला स्टाॅल लावून त्याची विक्री करत आहेत. यामुळे विक्री वाढीस लागली असल्याचे दिसून आले आहे. शेतातील ताजा भाजीपाला मिळत असल्याने अनेक जण भाजी घेण्यासाठी या शेतांकडेही जात आहे.

कलिंगडाची आवक

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात यंदा लागवड करण्यात आलेल्या कलिंगड, टरबूज यांचे उत्पादन येण्यास प्रारंभ झाला आहे. यातून त्याची खरेदी करण्यासाठी व्यापारी थेट बांधावर पोहोचत आहेत. पहिला हंगाम असल्याने कलिंगडाचे दरही महागले असल्याचे दिसून आले आहे.

गतिरोधकांची गरज

नंदुरबार : दोंडाईचा ते नंदुरबार रस्त्यावर रनाळे गावाजवळील वटबारे फाट्यावर गतिरोधकांची मागणी आहे. भरधाव वेगात येणा-या वाहनांमुळे या मार्गावर गतिरोधकांची अपेक्षा आहे. वटबारे गावाकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची भीती असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.

पंजाबातील हार्वेस्टर जिल्ह्यात दाखल

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात पेरणी करण्यात आलेल्या गहूची कापणी करण्यासाठी पंजाब राज्यातील अवजड हार्वेस्टर सध्या दाखल झाले आहेत. काही तासात या यंत्रांद्वारे गहू कापणी होत असल्याने शेतकऱ्यांचा त्यांच्याकडे ओढा अधिक असतो.

काटेरी झुडपे काढण्याची मागणी

बोरद : तळोदा तालुक्यातील विविध भागात असलेली काटेरी झुडपे काढण्याची मागणी होत आहे. प्रमुख रस्त्यांवरील काटेरी झुडपे वन्य प्राण्यांना लपण्यासाठी साधन ठरत असल्याने ही झुडपे स्वच्छ करून रस्ते मोकळे करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.