प्रकाशा येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:21 IST2019-12-18T12:21:44+5:302019-12-18T12:21:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरात चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला डेंग्यूची लागण झाली ...

IfiIYfVff ¹fZ ± fZ OZÔX¦¹fc¨ff ÷ Y¦¯f AfPXT »ff | प्रकाशा येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला

प्रकाशा येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरात चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला डेंग्यूची लागण झाली आहे. तिच्यावर शहादा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राने याबाबत जनजागृती करून गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरामध्ये चौथीच्या वर्गात शिकणाºया विद्यार्थिनीला डेंग्यूची लागण झाली आहे. तिला शहादा येथील खाजगी दवाखान्यात दोन दिवसांपासून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थिनीची रक्त तपासणी केली असता तिला डेंग्यूची लागण झाल्याचे समजले.
या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावातील रुग्णांची रक्त तपासणी करून घरातील पाणीसाठा, त्यात आढळणाºया अळ्या याची तपासणी व्हावी, कोरडा दिवस पाळण्यासंदर्भात जनजागृती व्हावी, गप्पी मासे सोडणे, धूळफवारणी आदी प्रतिबंधात्मक उपायोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: IfiIYfVff ¹fZ ± fZ OZÔX¦¹fc¨ff ÷ Y¦¯f AfPXT »ff