शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
2
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
3
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
4
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
5
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
6
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
7
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
8
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
9
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
10
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
11
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
12
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
13
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
14
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
15
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
16
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
19
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला जलसंधारणाच्या कामाचा आदर्श पायंडा

By admin | Updated: May 20, 2017 16:04 IST

गेल्या दोन वर्षापासून जलसंधारणाच्या कामात झोकून दिलेल्या या फाउंडेशनच्या कक्षा लवकरच विस्तारण्यात येणार

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 20 - निस्वार्थपणे काम केल्यास मदतीचे हात देखील पुढे येतात. तोच अनुभव येथील पूर्वीच्या सरदार पटेल सोशल ग्रृप व आताचे पी.के.अण्णा फाउंडेशनला आला. गेल्या दोन वर्षापासून जलसंधारणाच्या कामात झोकून दिलेल्या या फाउंडेशनच्या कक्षा लवकरच विस्तारण्यात येणार असल्याची माहिती पदाधिका:यांनी ‘लोकमत’संवाद उपक्रमात  दिली.
नंदुरबारच्या पी.के.अण्णा फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी  ‘लोकमत’ कार्यालयात भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी मुन्ना   पटेल, बाळू पटेल, संदीप पाटील, सुनील पाटील, प्रशांत पटेल व संजय पटेल हे सहभागी झाले होते.
कामाला सुरुवात
फाउंडेशनच्या उभारणीबाबत बोलताना त्यांनी सांगितले,  2014 मध्ये सरदार पटेल यांच्या रन फॉर युनिटी हा उपक्रम देशभरात राबविण्यात आला होता. त्याचअंतर्गत गिरिविहार परिसरातील काही युवकांनी मिळून कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. याच काळात गिरिविहार चौकाचे नामकरण सरदार वल्लभभाई पटेल चौक असे करण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी लागलीच होकार देत चौकाचे नामकरण केले. त्यामाध्यमातून मोठा कार्यक्रमही घडवून आणला गेला. त्यातून प्रेरणा घेत सरदार पटेल सोशल ग्रृपची निर्मिती करण्यात आली. याद्वारे रुग्णवाहिका घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याकरीता समाजाच्या 28 गावांमध्ये जावून प्रत्येकी 100 रुपयांची देणगी अर्थात पावती फाडण्यात आली.
निधी गोळा झाल्याने त्याचे फाउंडेशन करण्याचे पुढे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन असे नामकरण करण्यात आले. फाउंडेशनकडे आठ लाख गोळा झाले. अगदी गरिबातील गरिब व्यक्तीनेदेखील सहभाग दिला. कोरीट येथील एका दुकानदारकडे 50 रुपयेच होते, मात्र पावतीवर 100 रुपये छापलेले असल्यामुळे ते कसे द्यावे अशी विवंचना त्याला होती. परंतु त्याचे दातृत्त्व पहाता त्याला साधी पावती देवून त्याचेही योगदान घेण्यात आले. रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू आहे. नंदुरबार शहर व तालुका कार्यक्षेत्रात ती मोफत पुरविण्यात येते. फाऊंडेशनतर्फे काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने पदाधिका:यांनी विचार सुरू केला.
जलसंधारणात सहभाग
गेल्यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता होती. त्यामुळे जलसंधारण क्षेत्रात काम करावे अशी अपेक्षा काहींनी बोलून दाखविली. त्यानुसार पातोंडा गावाची निवड करण्यात आली. या गावातील 1972 मध्ये खोदण्यात आलेल्या तलावात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला होता. तो काढावा तसेच दोन चेक डॅममधीलही गाळ काढण्याचे ठरविण्यात आले. या ठिकाणी तीन जेसीबी मशिन व 35 ते 40 ट्रॅक्टरद्वारा गाळ काढण्यात आला. या ठिकाणी काम करणा:या लोकांना जेवनाचा डबा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने करीत होते. कोळदा येथे दोन व शिंदे येथे तीन चेक डॅम मधील देखील गाळ काढण्यात आला. एकुण साडेसात हजार ट्रॅक्टर गाळ गेल्यावर्षी फाउंडेशनतर्फे काढण्यात आला.
 लोकांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी परिश्रम घेणार आहेत. यापुढे कार्यक्षेत्राचा विस्तार करून विविध कामे त्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी यावेळी स्पष्ट केले.