शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर वर्षभरात २४१ रुपयांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

नंदुरबार : सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबातील गॅस सिलिंडर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. यानंतरही केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला ...

नंदुरबार : सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबातील गॅस सिलिंडर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. यानंतरही केंद्र शासनाने गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढविण्याचेच काम केले आहे. गत वर्षभराचा विचार केला तर गॅसच्या किमती २४१ रुपयांनी वाढल्या आहेत. २०१४ चा विचार केला तर गॅस सिलिंडरच्या किमती तब्बल दुपटीने वाढल्या आहेत. या तुलनेत मिळणारी सबसिडी मात्र गायब झाली आहे. यातून गृहिणीचे बजेट मात्र कोलमडले आहे. जीवनावश्यक बाब म्हणून केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना आणली. घरोघरी गॅस सिलिंडर दिले आणि केरोसिन काढून घेतले. आता केरोसिन नाही आणि गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणाबाहेर आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यातून परिस्थिती बिकट झाली आहे.

घर खर्च भागवायचा कसा

सर्वसामान्य महिलांना वाढत्या महागाईने मोठा झटका दिला आहे. दर महिन्याचे बजेट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा परिस्थितीत दोन पैसे वाचणे तर दूरच राहिले. उलट खर्च वाढला आहे. सरकारने महागाई नियंत्रित करावी. - वैशाली पाटील, गृहिणी

२०१४ मध्ये ४८० रुपयाला सिलिंडर मिळत होते. आता सिलिंडरची किंमत ८६८ रुपये झाली आहे. सहा वर्षात सिलिंडरची किंमत दुप्पटीने वाढली आहे. सबसिडी मात्र गायब झाली आहे. यातून महिलांमध्ये संतापाची लाट आहेत. - उज्ज्वला कदम, गृहिणी

जुलैमध्ये २५ रुपयाने वाढले दर

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला वाढतच आहे. आता जुलै महिन्यात नव्याने २५ रुपयांची भर पडली आहे. यामुळे ८६८ रुपयाला सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.

गावात पुन्हा चुली पेटल्या

उज्वला गॅस योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गॅस सिलिंडरच्या जोडणीसाठी मदत देण्यात आली. यातून गॅस कनेक्शन वाढले. आता गॅस भरायलाही पैसे नाही.

गॅस सिलिंडरची संख्या वाढल्याने गावामधील केरोसिन बंद करण्यात आले आहे. आता गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहे. मात्र केरोसिन गावात उपलब्ध नाही.

आदिवासी दुर्गम भागात महिलांनी गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली होती. एक वेळा सिलिंडर खरेदी केल्यानंतर आता जवळ पैसे नाही.

यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या आहेत. परिसरातील सरपण गाळा करून महिला गॅस असतानाही चुलीवर स्वयंपाक करीत आहे. यावरून ग्रामीण भागातील वास्तव्य पुढे आले आहे.