तळोद्यात भरदिवसा बंद घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:32+5:302021-05-15T04:29:32+5:30

तळोदा शहरातील गिरीधर आप्पा नगरात राहणारे गोरख रतन पाटील हे शुक्रवारी कामानिमित्त कुटुंबासह बाहेर गेले असल्याने त्यांचे घर ...

The house was broken into all day in the pool | तळोद्यात भरदिवसा बंद घर फोडले

तळोद्यात भरदिवसा बंद घर फोडले

तळोदा शहरातील गिरीधर आप्पा नगरात राहणारे गोरख रतन पाटील हे शुक्रवारी कामानिमित्त कुटुंबासह बाहेर गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दुपारी दोन वाजेदरम्यान बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले ५८ हजार रुपये चोरुन नेले. गोरख पाटील यांनी केळी व दुधाच्या उत्पन्नाचे पैसे आणून घरात ठेवेले होते. हेच ५८ हजार रूपये चोरट्यांनी चोरुन नेले. या चोरीमुळे शहरात चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

या प्रकरणी गोरख रतन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे करत आहेत.

Web Title: The house was broken into all day in the pool