होम कॉरेंटाईनचा युवकाने उडविली प्रशासनाची भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:46 IST2020-03-22T12:46:48+5:302020-03-22T12:46:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अरब देशातून आलेल्या व होम कॉरेंटाईनचा हातावर शिक्का असलेला युवक रेल्वे स्थानकात फिरत असल्याचे ...

Home Corentyne youth blows administration | होम कॉरेंटाईनचा युवकाने उडविली प्रशासनाची भंबेरी

होम कॉरेंटाईनचा युवकाने उडविली प्रशासनाची भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अरब देशातून आलेल्या व होम कॉरेंटाईनचा हातावर शिक्का असलेला युवक रेल्वे स्थानकात फिरत असल्याचे चित्र शनिवारी सकाळी दिसून आले.
नागरिकांनी पोलिसांना आणि सिव्हीलला माहिती दिल्यानंतर संबधीत युवकाला समज देवून घरी पाठविण्यात आले. त्याला १४ दिवस कॉरेंटाईन देण्यात आले आहे. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासने केले आहे.


रशियाहून आलेल्या दोघा विद्यार्थ्यांना तपासणीनंतर ठेवले कॉरेंटाईनमध्ये


शहादा : शिक्षणासाठी रशियात असलेले दोघे विद्यार्थी माघारी आल्याने दोघांची तपासणी करुन १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला.
शहादा येथील दोन विद्यार्थी रशिया येथे शिक्षणासाठी होते. सर्वत्र कोरोनाची भिती पसरल्याने हे दोघेही भारतात परतले. शुक्रवारी रात्री उशिरा शहरात आल्यानंतर लगेचच वैद्यकीय अधिकारी डॉ. के.जे.पाटील व डॉ.मोहन पाटील यांनी दोघांची तपासणी केली.
या तपासणीत कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळुन न आल्याने त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देऊन घरी पाठवण्यात आले.

Web Title: Home Corentyne youth blows administration