सोशल मीडियावर होळीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:49 IST2020-03-04T12:49:10+5:302020-03-04T12:49:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यात होळीला सुरुवात झाली असून यानिमित भ्रमणध्वनीसह व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावरही आदिवासी तरुणांमध्ये ...

Holi talk on social media | सोशल मीडियावर होळीची चर्चा

सोशल मीडियावर होळीची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यात होळीला सुरुवात झाली असून यानिमित भ्रमणध्वनीसह व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावरही आदिवासी तरुणांमध्ये चर्चा जोरात सुरू आहे.
आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दु:खे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते आहे. सर्वांना एकत्र करुन समुहजीवनाचे धडे देते.
होळीमुळे सातपुड्यातल्या आश्रमशाळा, शाळा ओस पडण्याची शक्यता आहे. वसतीगृहात राहून शिकणारी आदिवासी मुले गावाकडे परतली आहे. या मुलांची पावले न चुकता होळीसाठी वाजणाऱ्या डोलच्या तालावर थिरकणार आहे. होळीत किमान २०० ते ३०० ढोल, मोरखी-बावा यांची १५ ते २० हजाराची गर्दी आणि साथीत बेधूंद होऊन नाचणारी लाखो बांधवांची प्रत्येक होळीत उपस्थिती राहणार आहे.

रात्रभर होणारी होळीगीते व आदिम नृत्य. रात्रीच्या अंधार-उजेळात येथे ना कधी स्त्रिायांची छेडखानी होते ना कोणतीही हाणामारी. सर्व कसे एकमेकांत मिळून- मिसळून जातात. समता पर्व गाणारी ही होळी रात्रभर स्त्रिा-पुरुष एकत्र येऊन साजरी करणार आहेत. ही बाब आदिवासींच्या समुह जीवन दर्शवून जाते.

Web Title: Holi talk on social media