ठाणा येथील उत्सवात रंगले होळीनृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:48 IST2020-03-14T12:48:10+5:302020-03-14T12:48:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोदलपाडा : होळीपूर्वीच सुरु झालेला सातपुड्यातील होलीकोत्सव होळीनंतरही सुरुच आहे. त्यात ठाणा ता. अक्कलकुवा येथे होळी ...

Holi dance performed at a festival in Thane | ठाणा येथील उत्सवात रंगले होळीनृत्य

ठाणा येथील उत्सवात रंगले होळीनृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
मोदलपाडा : होळीपूर्वीच सुरु झालेला सातपुड्यातील होलीकोत्सव होळीनंतरही सुरुच आहे. त्यात ठाणा ता. अक्कलकुवा येथे होळी साजरी झाली. त्यात व्रत होळीसाठी मानता पाळणाऱ्या मोरखी यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे होळीनृत्य सादर करण्यात आले.
ठाणा येथील होलीकोत्सवासाठी केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर गुजरातमधील आदिवासी बांधवांनी देखील उपस्थिती नोंदवली. त्यात देवमोगरा, मोरखी, खडकापाणी, डोटकीपाडा, तिनखोल्या, कुवा यासह अन्य गावांमधील आदिवासी बांधवांचा समावेश होता. तर या उत्सवासाठी उपेक्षित, अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणाºया लोकसंघर्ष या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती नोंदवली. शिवाय भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी यांची प्रमुख उपस्थिती राहिली. ठाणा येथे रात्रभर होळीचा कार्यक्रम सुरू राहिला. दोन्ही राज्यातील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत तेथील होळी तेथीलच गावपुंजारांच्या हस्ते पेटविण्यात आली.

Web Title: Holi dance performed at a festival in Thane