भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; एक जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:31+5:302021-03-24T04:28:31+5:30

नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना नंदुरबार-साक्री रस्त्यावर ठाणेपाडा शिवारात ...

Hit by a two-wheeler; One was killed on the spot | भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; एक जण जागीच ठार

भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; एक जण जागीच ठार

नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना नंदुरबार-साक्री रस्त्यावर ठाणेपाडा शिवारात घडली. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानाभाऊ लोटन पाटील (६९) रा.खंडलाय, ता.धुळे असे मयताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, नानाभाऊ पाटील हे नंदुरबार-साक्री रस्त्याने आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच १८- बीएच ५२३९) जात असताना ठाणेपाडा आश्रमशाळेसमोर भरधाव आलेल्या बोलेरो वाहनाने धडक दिली. त्यात रस्त्यावर फेकले जाऊन नानाभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पुतण्यास जबर मार लागला. अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला. त्यामुळे त्याचे नाव व वाहन नंबर कळू शकला नाही.

याबाबत विठोबा नानाभाऊ पाटील यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कैलास माळी करीत आहेत.

Web Title: Hit by a two-wheeler; One was killed on the spot