शेतीच्या हिस्से वाटणीवरून मारहाण

By Admin | Updated: May 24, 2017 15:04 IST2017-05-24T15:04:16+5:302017-05-24T15:04:16+5:30

धडगाव तालुक्यातील खुंटामोडी येथे शेतीतील हिस्से वाटणीच्या वादातून एकास पाच जणांनी मारहाण करत जखमी केल़े

Hit farming by sharing the share | शेतीच्या हिस्से वाटणीवरून मारहाण

शेतीच्या हिस्से वाटणीवरून मारहाण

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.24- धडगाव तालुक्यातील खुंटामोडी येथे शेतीतील हिस्से वाटणीच्या वादातून एकास पाच जणांनी मारहाण करत जखमी केल़े ही घटना मंगळवारी सकाळी घडली़ 
खुंटामोडी येथील पिसा दोह:या वळवी हे सकाळी भावाकडे गेले असता, त्याठिकाणी बावा दोह:या वळवी, दिलीप बावा वळवी, रमेश बावा वळवी, आपसिंग बावा वळवी, दीपक बावा वळवी सर्व रा़ खुंटामोडी हे आल़े सर्व पाच संशयितांना पिसा वळवी यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली़ वळवी यांनी तसा जाब विचारला असता, सर्व पाच संशयित आरोपींनी पिसा वळवी यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली़ यात बावा वळवी याने हातातील दगड नाकावर मारला तर दिलीप वळवी याने दुसरा दगड डोक्यावर मारल्याने पिसा वळवी हे जखमी झाले आहेत़ इतर तिघा आरोपींनी जखमी अवस्थेतच वळवी यांना बेदम मारहाण केली़ 

Web Title: Hit farming by sharing the share