शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती तुर्तास रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस भरतीबाबत मोठी आशा लावून बसलेल्या इच्छुक युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने भरतीचा आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस भरतीबाबत मोठी आशा लावून बसलेल्या इच्छुक युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने भरतीचा आदेश तात्पुरता स्थगित केला आहे. आता कधी ही भरती होईल याकडे युवकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, काही युवक वयोमर्यादा निघून जाण्याची स्थिती असून त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस दलात भरती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यादृष्टीने अनेक युवकांनी तयारी सुरू केली होती. अभ्यास आणि शाररिक कसरत याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने भरती संदर्भात आदेश देखील काढला होता. परंतु तो लागलीच रद्द करण्यात आला. त्यामुळे तयारी केलेल्या युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा या युवकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, युवकांनी आपली तयारी सुरूच ठेवली असून  भरती होईल अशी अपेक्षा आहे.

सहा हजार लोकांमागे एक पोलीसजिल्ह्यात पोलीस दलातील कर्मचारी संख्या १५०० पर्यंत आहे. तर जिल्ह्यातील एकुण लोकसंख्या ही १६ लाखापेक्षा अधीक आहे. याचा विचार करता साधारणत: सहा हजार लोकांमागे एक पोलीस कर्मचारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. 

 

गेल्या तीन वर्षांपासून पोलीस भरती प्रलंबित असून अहोरात्र मेहनत उमेदवार घेत आहेत. परंतु शासनाकडून भरतीची निश्चित तारीख व पदे भरत भरले जात नाहीत. प्रत्येक वर्षी फक्त आश्वासन मिळत असल्याने पोलीस भरती करणारे उमेदवार निरा होताना दिसत आहे. ते संभ्रमात आहेत म्हनून शासनाने योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर मेगा भरती काढावी.                 - विक्की साळवे, नंदुरबार.

 राज्यसरकार पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यावरून उमेदवारामध्ये सभ्रम निर्माण करत   आहे. पोलीस भरती बाबत प्रक्रीया बाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, शासनाने आधिक वेळ उमेदवारांना आशेवर न ठेवता पोलीस भरती जाहीर करून प्रकिया राबवावी, जेणे करून भरती करणाऱ्या तरूणामध्ये उत्साह वाढेल.                  -अमोल शेवाळे, नंदुरबार.

 

पोलीस भरती करणारे उमेदवार दिवसभर अभ्यास करून सांयकाळी मैदाणी सराव करत आहे. मात्र सरकार आश्वासन देत असून भरती प्रकिया बाबत निर्णय घेत नसल्याने फक्त आशेवर ठेवले आहे. त्यामुळे एक वर्षानी वय बाद होणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होणार आहे. शासनाने दिलासादायक निर्णय घ्यावा.       -रवींद्र चव्हाण, नंदुरबार.