शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कानठळ्या बसविणारे हॅार्न व सायलेन्सर लावलेले वाहनधारक मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST

नंदुरबार : दुचाकी व चारचाकीसह जड वाहनांनाही लावण्यात आलेले कर्णकर्कश हॅार्न ध्वनिप्रदूषण तर करीत आहेतच शिवाय अनेकांच्या आरोग्यालाही धोका ...

नंदुरबार : दुचाकी व चारचाकीसह जड वाहनांनाही लावण्यात आलेले कर्णकर्कश हॅार्न ध्वनिप्रदूषण तर करीत आहेतच शिवाय अनेकांच्या आरोग्यालाही धोका पोहचवत आहेत. याबाबतचा कायदा संबंधितांकडून धाब्यावर बसविला जात आहे. वाहतूक विभागातर्फे कारवाई केली जात असली तरी ती मर्यादित स्वरूपाची राहत असल्यामुळे अशा वाहनचालकांचे फावत असल्याचे चित्र आहे.

कर्णकर्कश हॅार्न आणि आवाज करणारे सायलेन्सरचे फॅड तरुणाईत मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक युवक आपल्या दुचाकीला रुग्णवाहिकेसारखे हॅार्न बसवित असतात. शिवाय काहीजण चित्रविचित्र आवाजाचे हॅार्नदेखील बसवितात. काहीजण तर कानठळ्या बसविणारे हॅार्न बसवून आपली मर्दुमकी गाजवत असतात. यामुळे मात्र अनेकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. शिवाय ध्वनिप्रदूषणाचेदेखील उल्लंघन केले जात असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखा वेळोवेळी यासंदर्भात कारवाई करीत असली तरी ती मर्यादित स्वरूपाची राहत असल्याचेही चित्र आहे.

बुलेट केल्या होत्या जप्त

n वाहतूक शाखेतर्फे तीन महिन्यांपासून आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. दहा वाहने जप्त करून ३० पेक्षा अधिक वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याने हा प्रकार आता कमी झाला.

कर्णकर्कश हॅार्न लावलेले वाहनधारक मोकाटच...

n नंदुरबारसह शहादा शहरात कर्णकर्कश आवाज असलेल्या हॅार्न लावण्याचे फॅड आहे. त्यामुळे असे वाहनधारक मोकाटच आहेत. वास्तविक नंदुरबार शहरात औद्योगिक क्षेत्र नसल्यामुळे सर्वच क्षेत्र हे शांतता झोन म्हणून आहे. त्यामुळे विशिष्ट डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे हॅार्न वाजविण्याचे प्रकार सर्रास आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांवर सरसकट कारवाई करणे अपेक्षित आहे.

पाच वर्ष कैद किंवा एक लाख रुपये दंड

n पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार शांतता झोन असलेल्या परिसरात विशिष्ट डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे हॅार्न वाजविण्यास मनाई आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई होऊन पाच वर्ष कैद व एक लाख रुपये दंडाची शिक्षा करण्याचे प्राविधान या कायद्यात आहे.

कर्णकर्कश हॅार्न आणि आवाज करणारे सायलेन्सर या विरोधात वाहतूक शाखेतर्फे लवकरच कारवाई सुरू होणार आहे. पोलीस अधीक्षकांनी सूचना केलेल्या आहेत. लवकरच याबाबत नियोजन करून मोहीम राबविण्यात येईल. दररोज याबाबत कारवाई होतेच. -रवींद्र कळमकर,

प्रभारी निरीक्षक, वाहतूक शाखा.