शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सर्वेक्षणासाठी आरोग्य पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात लक्षणे असलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणी व सर्वे आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात लक्षणे असलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणी व सर्वे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. यासाठी संबंधीत आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोना या घातक महामारीने राज्यात प्रचंड थैमान घातले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील महसूल प्रशासनाबरोबरच आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकून पडलेले स्थलांतर मजूर राज्यशासनाने परवानगी दिल्यामुळे गावाकडे परतू लागली आहेत. गुजरातमधून दररोज शेकडो मजूर ग्रामीण भागात दाखल होत आहे. अर्थात या मजुरांची आमलाड येथील विलगीकरण कक्षात आरोग्य तपासणी केली असली तरी त्यांना होमक्वॉरंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. साहजिकच आरोग्य विभागाकडून अधिक खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.प्रतापपूर, बोरद, सोमावल, वाल्हेरी या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील गावांमध्ये आरोग्य कर्मचारी, आशागट प्रवर्तक, आशा कर्मचाºयांच्या माध्यमातून घरोघरी तपासणी केली जात आहे. प्रत्येक घरातील अशी लक्षणे असलेल्या रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शिंदे, डॉ.विशाल चौधरी, डॉ.सायसिंग पावरा, डॉ.राकेश पावरा, डॉ.प्रशांत पवार, डॉ.किरण पवार, डॉ.सचिन पाटील, डॉ.अरूण लांडगे, डॉ.पंकज पावरा, डॉ.खुमानसिंग पावरा, डॉ.विरेंद्र पावरा यांचा पर्यवेक्षणाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर हे पथक ज्यांना आमलाड विलगीकरण कक्षातून होमक्वॉरंटाईन केले आहे अशांनादेखील मार्गदर्शन करीत आहे. साहजिकच तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या या सर्वेक्षण तपासणी मोहिमेमुळे निश्चितच कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे. आरोग्य यंत्रणेला उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे.कोरोना या महामारीस तालुक्यात अटकाव आणण्यासाठी तालुक्यातील वैद्यकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असतांना तळोदा शहरात बाहेरुन येणाºयांची प्रचंड गर्दी होत आहे. बँका, किराणा दुकानांकडे तर विदारक चित्र दिसून येत आहे. प्रशासन कितीही बैठका, नियोजन करीत असले तरी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. सकाळी तर बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्रही दिसून आले आहे. वास्तविक आतापावेतो तालुक्याने कोरोनाला शिरकाव करून दिलेला नाही. परंतु बाजारातील गर्दीचे चित्र पाहिल्यावर निश्चितच धोक्याची घंटा निर्देशीत करते.