शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात राबविणार आरोग्य सर्व्हेक्षण मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील कोरोना प्रादुर्भावला अटकाव व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. मौलवींची बैठक, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील कोरोना प्रादुर्भावला अटकाव व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. मौलवींची बैठक, आशा सेविकांचा मेळावा, शहरात ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती केली जात आहे. संपुर्ण शहरात सर्व्हेक्षण मोहिम राबविली जाणार आहे.जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नंदुरबार शहरात आहेत. सद्य स्थितीत नंदुरबारातील ५० पेक्षा अधीक रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभिर्याने घेऊन उपाययोजनांना गती दिली आहे.मौलवींची बैठकरविवारी पालिका सभागृहात शहरातील सर्व मौलवींची बैठक आयोजित करण्यात आली होती. तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड, पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध सुचना संबधितांना देण्यात आल्या. विवाह समारंभात ५० पेक्षा अधीकजण व अंत्ययात्रेत २० पेक्षा अधीक जण सहभागी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी समाजात जनजागृती करावी. कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाल्यास प्रशासनास कळवावे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य द्यावे. मास्क वापरावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गंभीर आजारी व्यक्तींना बाहेर निघू देवू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.माहिती संकलीत करणारशहरात सर्व्हे करून माहिती संकलीत करण्याच्या सुचना आशा सेविकांना देण्यात आल्या. शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी व आशा सेविकांना त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. घरोघरी जाऊन नागरिकांच्या आजारासंदर्भात माहिती संकलीत करण्यात येणार आहे. त्यात कुटूंबातील सदस्यांची संख्या, १० वर्षाखालील लहान मुल व ६० वर्षावरील वयोवृद्ध व्यक्तींची संख्या, त्यांना असलेले आजार व त्याबाबत माहिती संकलीत करण्यात येणार आहे. संपुर्ण शहरात सर्व्हेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.ध्वनीक्षेपकाद्वारे जागृतीपालिकेतर्फे शहरात रिक्षावर ध्वनीक्षेपक लाऊन जनजागृती केली जात आहे. याशिवाय सकाळी घंटा गाडींवर देखील अशा पद्धतीने ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. त्यात बाजाराच्या ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये, विनाकारण बाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क किंवा रुमाल बांधावा यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी देखील वेळोवेळी जनतेला आवाहन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पालिका हद्दीत सकाळी कचरा संकलनासाठी घंटागाडीचा सर्वच भागात वापर केला जातो. त्यामुळे या घंटागाडींवर आधीच ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. या ध्वनीक्षेपकात आता कोवीड जनजागृतीसंदर्भात संदेश दिले जात आहे. सकाळी-सकाळी जनजागृतीपर संदेश कानावर पडत असल्यामुळे त्याच्या परिणामही चांगला दिसून येत आहे.