मुलीच्या पोषणासाठी माहेरुन पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:55 IST2019-12-27T11:55:30+5:302019-12-27T11:55:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलीला जन्म दिला म्हणून तिच्या पालनपोषणासह शिक्षणासाठी माहेरुन तीन लाख आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा ...

Harassment of a bride to raise money for her daughter's nutrition | मुलीच्या पोषणासाठी माहेरुन पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ

मुलीच्या पोषणासाठी माहेरुन पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलीला जन्म दिला म्हणून तिच्या पालनपोषणासह शिक्षणासाठी माहेरुन तीन लाख आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ झाल्याचा प्रकार सोनगड जि़ तापी येथे घडला़ विवाहितेचे माहेर नंदुरबार शहरातील असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे़
दिपाली हेमंत तायडे असे विवाहितेचे नाव असून त्यांचा नोव्हेंबर २०१८ पासून सासरच्यांकडून छळ सुरु होता़ सोनगड येथील सासर तर शहरातील रोहिदास चौक येथील माहेर असलेल्या दिपाली यांनी कन्येला जन्म दिला होता़ यातून त्यांचा पती हेमंत संजय तायडे, सासरे संजय रामा तायडे, सासू भानूबाई तायडे सर्व़ रा़ सोनगड यांनी वेळावेळी छळ सुरु केला होता़ दरम्यान मुलीच्या पोषण आणि शिक्षणासाठी माहेरुन तीन लाख रुपयांची रक्कम आणावी अशी मागणी करत मारहाण केली होती़ यात रेश्मा दिपक गवळे, दिपक रमेश गवळे दोन्ही रा़ सुरत, अशोक व्यंकट अहिरे, धनेश्वरी अशोक अहिरे, निलेश प्रल्हाद माने रा़ नंदुरबार यांनीही वेळोवेळी साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
छळाला कंटाळून दिपाली यांनी माहेरी येऊन महिला दक्षता समितीत अर्ज दिला होता़ समितीत झालेल्या सुनावणीत समझोता होऊ शकला नव्हता़ याबाबत दिपाली तायडे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Harassment of a bride to raise money for her daughter's nutrition