नंदुरबारात ३८ लाख ३२ हजाराचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:37+5:302021-07-05T04:19:37+5:30

गणेश चंपालाल पाटील, रा.म्हसवे, ता.पारोळा, जि.जळगाव असे गुटखाच्या गुन्ह्यातील संशयीताचे नाव आहे. उपनगर पोलिसांना रविवारी पहाटे गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा ...

Gutka worth Rs 38 lakh 32 thousand seized in Nandurbar | नंदुरबारात ३८ लाख ३२ हजाराचा गुटखा जप्त

नंदुरबारात ३८ लाख ३२ हजाराचा गुटखा जप्त

गणेश चंपालाल पाटील, रा.म्हसवे, ता.पारोळा, जि.जळगाव असे गुटखाच्या गुन्ह्यातील संशयीताचे नाव आहे. उपनगर पोलिसांना रविवारी पहाटे गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी पथकाला नंदुरबार ते वाका चार रस्ता या भागात गस्त घालण्यास सांगितले. पहाटे चार वाजेच्या सुमारास संशयीत ट्रक (क्रमांक एमएच १८-बीजी ३७४७) गुजरातमधून महाराष्ट्राच्या हद्दीत येताच तिला अडविले. चालकाला विचारणा केली असता त्याने ताडपत्री असल्याचे सांगितले, परंतु पोलिसांनी तपासणी केली असता त्यात तब्बल ३८ लाख ३२हजार ४०० रुपयांचा विमल पानमसाला गुटखा आढळून आला. १५ लाखांच्या ट्रकसह एकुण ५३ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरिक्षक संदीप पाटील, फौजदार प्रशांत राठोड, जमादार शिवाजी काटकर, सुनील येलवे, निलेश पाटील, योगेश निकम, सुनील राठोड यांनी केली. चालकाविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहर पोलिसांनी देखील कंजरवाडा भागातून ४० हजाराचा चार किलो गांजा शनिवारी जप्त केला. संशयीत सुदाम टिळंगे यास अटक करण्यात आली आहे. तो या भागात गांजा विक्री करीत होता असे पोलीस निरिक्षक अर्जून पटले यांनी सांगितले.

Web Title: Gutka worth Rs 38 lakh 32 thousand seized in Nandurbar