शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या पद्धतीने गुटका व मद्यविक्री सुुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

नंदुरबार : शहरात अवैध गुटका विक्री व गावठी मद्याची विक्री छुप्या पद्धतीने होत आहे. गुजरात राज्यातून येणारा अवैध गुटका ...

नंदुरबार : शहरात अवैध गुटका विक्री व गावठी मद्याची विक्री छुप्या पद्धतीने होत आहे. गुजरात राज्यातून येणारा अवैध गुटका पकडल्यानंतर शहरातील अवैध गुटका विक्रीबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचेही स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने कारवाईचा वेग कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

निकामी बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडली

नंदुरबार : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाकडून दरवर्षी निकामी ठरलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून त्या-त्या भागात सिंचनाची सुविधा करण्यावर भर दिला जातो. परंतु जिल्ह्यात मात्र या उलट स्थिती असून दुरुस्ती होत नसल्याने निकामी बंधाऱ्यांची संख्या वाढत आहे.

मिनीबस सुरू झाल्याने समाधान

धडगाव : नंदुरबार ते धडगाव दरम्यान मिनीबसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसभरात तळोदा मार्गाने धावणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांच्या अडचणी दूर होत आहेत. चांदसैली मार्गाने धडगावकडे जाणाऱ्या या बसेसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे. बसेस सुरू झाल्याने दुर्गम भागातून नंदुरबार येथे वैद्यकीय तपासणीसाठी येणारे रुग्ण, विद्यार्थी, कागदपत्रांसाठी धावपळ करणाऱ्या नागरिकांना सोयीचे झाले आहे.

नागरिकांचे हाल

धडगाव : तालुक्यातील सुरवाणी ते असली दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून या मार्गाने प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी आहे. दुर्गम भागातील नागरिकांचा वावर असलेल्या या रस्त्यावर २४ तास वाहतूक सुरू असते.

गटारी दुरुस्त करा

नंदुरबार : तालुक्यातील काकर्दे येथे गटारींची दुरुस्ती करून देण्याची मागणी आहे. याबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. गावातील गटारी तुटल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी ह्या गटारी दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू होता.

नावली ते खोलविहीर रस्त्याची दुरवस्था

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील नावली ते खोलविहीर दरम्यानचा रस्ता खराब झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या मार्गाने नवापूर तालुक्यातील नागरिक हे खांडबारा व खोलघर परिसरात जातात. परंतु रस्ता खराब असल्याने त्यांना अधिक वेळ लागत आहे. रस्त्यावरची खडी पूर्णपणे उखडली असून डांबरीकरणही निघून गेल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांनी प्रवास करणे अवघड होत आहे.

खड्ड्यांमुळे त्रस्त

नंदुरबार : गुजरात हद्दीवरील सावळदा ता. नंदुरबार ते प्रकाशा पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. हा रस्ता दुरुस्तीबाबत कारवाई करण्यात आलेली नाही. मार्गावरून गुजरात राज्यातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांना खड्ड्यांमुळे त्रास होत आहे.

एसटीसाठी पाठपुरावा

अक्कलकुवा : दुर्गम भागातील गाव-पाड्यांवर एसटी बसेस सुरू व्हावी अशी अपेक्षा आहे. भांग्रापाणी, जमाना, काठी, भगदरी, वडफळी या मार्गांवर बसेस वाढवण्याची मागणी आहे. बसेस नसल्याने दुर्गम भागातील नागरिक अवैध प्रवासी वाहनांचा आधार घेतात. या भागात एकच बसफेरी होत आहे.

निवडणुकांमुळे गावोगावी उत्साह

अक्कलकुवा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांसाठी पोटनिवडणूक होत असल्याने सध्या खापर व अक्कलकुवा परिसरात उत्साह आहे. यातून रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे यंदाही निवडणूक रंगतदार होणार आहे.

नंदुरबार तालुक्यातही नागरिकांमध्ये चर्चा

नंदुरबार : तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून कोण अर्ज करणार किंवा काय होणार याबाबत चर्चा सुरू आहेत. ग्रामीण भागातील सोशल मीडियावर याबाबत अनेक चर्चा सुरू असल्याचे सध्या दिसून येत आहे.