गुजरातच्या वाळूची वाहतूक एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:09 IST2020-06-16T12:09:10+5:302020-06-16T12:09:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील वाळू वाहतुकीला जिल्ह्यातून बंदी असतांनाही त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील एकाविरुद्ध गुन्हा ...

Gujarat sand transport is a crime against one | गुजरातच्या वाळूची वाहतूक एकाविरुद्ध गुन्हा

गुजरातच्या वाळूची वाहतूक एकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातमधील वाळू वाहतुकीला जिल्ह्यातून बंदी असतांनाही त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पाठोपाठ आता अक्कलकुवा येथे ही दुसरी कारवाई झाली आहे. त्यामुळे वाळू ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
सुनील सोनू वळवी रा. गलोठा, ता.अक्कलकुवा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ट्रक व वाळू जप्त करण्यात आली आहे. गुजरातमधील वाळू मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक या भागात जाते. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. शिवाय अपघात देखील मोठ्या प्रमाणावर घडत होते.
वाळूच्या वाहनांमुळे रुग्णवाहिकेचा रस्ता अडविला गेल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात गुजरातच्या वाळू वाहतुकीला जिल्ह्यात बंदी घातली आहे. असे असतांनाही त्याची वाहतूक होत असल्याची बाब नवापूर येथे उघड झाली होती. तेथे १३ वाहनांवर चार दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली आहे. आता अक्कलकुवा येथे दुसरी कारवाई झाली.
याबाबत हवालदार धनंजय धनगर यांनी फिर्याद दिल्याने सुनील वळवी याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक व वाळू जप्त केली आहे.

Web Title: Gujarat sand transport is a crime against one