बंधारपाडा येथे ग्रामपंचायतीतर्फे लसीकरणाबाबत मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:39+5:302021-05-16T04:29:39+5:30

या वेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अविनाश मावची, बंधारपाडाच्या सरपंच प्रियंका शंकर गावित, ...

Guidance camp on vaccination by Gram Panchayat at Bandharpada | बंधारपाडा येथे ग्रामपंचायतीतर्फे लसीकरणाबाबत मार्गदर्शन शिबिर

बंधारपाडा येथे ग्रामपंचायतीतर्फे लसीकरणाबाबत मार्गदर्शन शिबिर

या वेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अविनाश मावची, बंधारपाडाच्या सरपंच प्रियंका शंकर गावित, पंचायत समिती सदस्य कांतीलाल गावित, वडसत्राचे सरपंच बाबूराव गावित, बाळू गावित, आदी उपस्थित होते.

तहसीलदार कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर करणे, हात वारंवार धुणे, शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीप्रमाणे आता लस घेणेदेखील महत्त्वाचे साधन ठरत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यास येणारी तिसऱ्या लाोपासून बऱ्याचअंशी आपला बचाव होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. गटविकास अधिकारी माळी यांनीही लसीमुळे कोणतीही हानी होत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता नि:संकोचपणे लस घ्यावी, असे आवाहन केले. तालुका आरोग्याधिकारी डॉ. मावची यांनीही मार्गदर्शन केले. पास्टर बाळू गावित यांनी आदिवासी बोलीभाषेतून जनजागृती केली. कार्यक्रमासाठी उपसरपंच याकूब रमेश गावित, अंगणवाडी गटप्रवर्तक अंजना गावित, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: Guidance camp on vaccination by Gram Panchayat at Bandharpada