शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री, आमदार आणि अधिकारी शेतक:यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी शहादा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी शहादा तालुक्यात भेट दिली़ यावेळी त्यांच्यासोबत आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी हजर होत़े शेतक:यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री आमदार व अधिका:यांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली़      शहादा तालुक्यातील विविध गावांमध्ये दिलेल्या भेटीनंतर पालकमंत्री रावल यांनी सारंगखेडा ता़ शहादा येथे घेतलेल्या आढावा बैठकीत अधिका:यांना सूचना करुन येत्या शुक्रवार्पयत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिल़े पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शासनाकडे पिकनिहाय नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे सांगून नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची कारवाई होणार असल्याचे सांगितल़े रविवारी झालेल्या या पाहणी दौ:यावेळी  आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहायक जिल्हाधिकारी अविनाश पांडा, नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयपालसिंह रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, क़ेडी़पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ़ किशोर पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही़बी़ जोशी यांच्यासह सर्व तहसीलदार, कृषी, महसूल विभाग, बँका आणि सहकारी संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री रावल यांनी शहादा तालुक्यातील कळंबू, अनरद, वरूळ, मंदाणे, डोंगरगाव, दुधखेडायेथील शेतशिवारात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतक:यांसोबत संवाद साधला़ शेतक:यांनी पिकांची स्थिती सांगून भरपाईची मागणी केली़ 

सारंगखेडा येथील दत्त मंदिर सभागृहात पालकमंत्री रावल यांनी आढावा बैठक घेतली़ यात महसूल आणि कृषी विभागाच्या अधिका:यांनी शुक्रवार्पयत पंचनामे पूर्ण करुन भरपाईचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या, तसेच पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शनिवारी ग्रामसभा घेऊन चावडी वाचन करण्याचे सूचित केल़े चावडी वाचनाचा अहवाल 10 रोजी द्यावा, पिकनिहाय पंचनामे करावे, विमा कंपन्यांनी शेतक:यांना लाभ द्यावा, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात कृषी, ग्रामविकास, महसूल अशा अधिकारी कर्मचा:यांची पथके तयार पंचनाम्यांना गती देण्याचे पालकमंत्री रावल यांनी बैठकीत सांगितल़े तसेच जिल्हाधिकारी यांनी पंचनाम्यांचा दैनंदिन आढावा घेण्याबाबतही ते शवेटी म्हणाल़े बैठकीत उपस्थित विभागप्रमुखांनी अतीवृष्टी आणि अवकाळी पावसाची आकडेवारी सादर करुन नुकसानीचा आढावा आकडेवारीच्या स्वरुपात सांगितला़ बैठकीत अधिका:यांसोबतच शेतकरी व ग्रामस्थांनी हजेरी लावली होती़ यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे पैसेच खात्यावर मिळाले नसल्याची तक्रार केली़ यावेळी अधिका:यांनी सारावासारव करत वेळ मारुन नेली़ दरम्यान पालकमंत्री रावल यांनी तहसीलदारांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या़