शहादा तालुक्यातील वाघोदा येथे भूजल मार्गदर्शन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:04 IST2020-03-14T13:04:20+5:302020-03-14T13:04:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील वाघोदा येथे ग्रामस्तरीय भूजल सार्वजनिक विचार विमर्श कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ ...

Groundwater Guidance Workshop at Waghaoda in Shahada taluka | शहादा तालुक्यातील वाघोदा येथे भूजल मार्गदर्शन कार्यशाळा

शहादा तालुक्यातील वाघोदा येथे भूजल मार्गदर्शन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील वाघोदा येथे ग्रामस्तरीय भूजल सार्वजनिक विचार विमर्श कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ पुणे येथील केंद्रीय भूमीजल मंडलाच्या राज्य एकाकानेउपक्रम घेतला़
कार्यशाळेत शहादा येथील हरीयाली ट्रस्टचे संचालक हैदर अली नुराणी, सहायक भूवैज्ञानिक सुजीत सुरेश शिंपी, केंद्रीय भूमिजल मंडळाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक अनुराधा भाटिया, कनिष्ठ भूवैज्ञानिक जुनेद अहमद उपस्थित होते़ कार्यशाळेत अनुराधा भाटिया यांनी जलचक्र, भूजलाचे महत्त्व याबाबत माहिती देत ग्रामस्थांसोबत पाणी समस्येवर संवाद साधला़ हैदर अली नुरानी यांनी जलसंवर्धनासाठी वृक्ष लागवड व वनसंवर्धनाची गरज, पाणी बचतीचे परिणामकारक उपाय यावर मार्गदर्शन केले़ सुजित शिंपी यांनी जिल्ह्यातील भूस्तर रचना व भूजल पुनर्भरणाचे शास्त्रीय दृष्टीकोनातून महत्त्व पटवून दिले़ सूत्रसंचालन जुनेद अहमद यांनी केले़ ग्रामसेवक सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले़

Web Title: Groundwater Guidance Workshop at Waghaoda in Shahada taluka