जिल्ह्यातील दुर्गम भागात राज्यपाल भेट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:24 PM2020-02-17T12:24:04+5:302020-02-17T12:24:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत़ याअंतर्गत २० व २१ ...

The Governor will visit remote areas of the district | जिल्ह्यातील दुर्गम भागात राज्यपाल भेट देणार

जिल्ह्यातील दुर्गम भागात राज्यपाल भेट देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील आकांक्षित जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत़ याअंतर्गत २० व २१ फेब्रुवारी रोजी ते जिल्ह्यात येत आहेत़
राज्यपाल कोश्यारी हे २० रोजी सकाळी मोलगी येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत़ येथून १० वाजेच्या सुमारास मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन माहिती घेणार आहेत़ या भेटीनंतर ते भगर प्रोसेसिंग युनिटची पाहणी करुन आदिवासी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन करणार आहेत़ या भेटीदरम्यान आकांक्षित जिल्ह्यासंबधी बैठक घेऊन स्थानिक आदिवासी बांधवांसोबत संवाद साधणार आहेत़ याउपक्रमानंतर भगदरी ता़अक्कलकुवा येथील माती नाला बांधची पाहणी करुन याच परिसरातील अंगणवाडी व पोषण परसबागेची पाहणी करणार आहेत़
राज्यपाल कोश्यारी हे सायंकाळपर्यंत भगदरी येथील पशुसंवर्धन कार्यक्रमांतर्गत उपक्रम, पोल्ट्री युनिट, सिमेंट नाला बांध यांची पाहणी करुन उपस्थितांसोबत संवाद साधणार आहेत़ दौऱ्यादरम्यान मनरेगाच्या वैयक्तिक लाभार्थींची भेट घेऊन पेरु बागेला भेट देतील़ राज्यपालांच्या हस्ते भगदरी पशुसंवर्धन केंद्र, शासकीय आश्रमशाळा येथे विविध उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे़
मोलगी येथे मुक्काम करुन २१ रोजी सकाळी मोलगी येथून रवाना होणार आहेत़ सकाळी नंदुरबार येथील विधी महाविद्यालयात कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहणार आहे़
विधी महाविद्यालयातील कार्यक्रमात हजेरी दिल्यानंतर जळखे येथील डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या अनुदानित आश्रमशाळेत भेट देत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत़ दुपारी नावली, ता़नवापूर येथील शेतकऱ्यांसोबत संवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर ते खांडबारा येथून मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे़ राज्यपालांच्या दौºयामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे़

Web Title: The Governor will visit remote areas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.