आध्यात्मिक ज्ञानामार्फत स्वर्णीम युग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:55+5:302021-03-08T04:28:55+5:30

आज मनुष्याला वास्तविक ज्ञानाद्वारे पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत माणसाकडे भौतिक ज्ञान भरपूर आहे, साधन सुविधांची काही कमी ...

The golden age through spiritual knowledge | आध्यात्मिक ज्ञानामार्फत स्वर्णीम युग

आध्यात्मिक ज्ञानामार्फत स्वर्णीम युग

आज मनुष्याला वास्तविक ज्ञानाद्वारे पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत माणसाकडे भौतिक ज्ञान भरपूर आहे, साधन सुविधांची काही कमी नाही. परंतु सुख आणि शांतीची कमी दिसून येते. ज्या सुखाची अत्यंत गरज आहे ते ईश्वरीय ज्ञानापासूनच मिळेल. हे ज्ञान स्वत: परमपिता परमात्मा शिव प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयद्वारा संपूर्ण विश्वात देत आहे. संस्थेने या ज्ञानाचा प्रचार-प्रसार संपूर्ण मानव जातीत पोहोचविण्याची योजना बनवली आहे. म्हणून २०२०-२१ या वर्षात आध्यात्मिक ज्ञानाद्वारे स्वर्णीम युगाची स्थापना करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गाव, शहराची रूपरेषा तयार केली आहे. माता, पिता आणि मुलांमध्ये योग्य संस्कारांच्या अभावामुळे चिंता वाढत आहे. परमात्म्याची विश्वव्यापी योजनेमध्ये आम्ही सर्व जुळलो आहोत. जीवनामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची धारणा केल्याशिवाय आपल्या देशात व विश्वात समाजाची रूपरेषा बदलणार नाही.

Web Title: The golden age through spiritual knowledge