नर्मदा किनारच्या भागात विहिरी तयार करण्यास प्राधान्य द्या- डॉ.राजेंद्र भारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST2021-02-19T04:21:09+5:302021-02-19T04:21:09+5:30

जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...

Give priority to construction of wells in the banks of Narmada- Dr. Rajendra Bharud | नर्मदा किनारच्या भागात विहिरी तयार करण्यास प्राधान्य द्या- डॉ.राजेंद्र भारुड

नर्मदा किनारच्या भागात विहिरी तयार करण्यास प्राधान्य द्या- डॉ.राजेंद्र भारुड

जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, स्थलांतर रोखण्यासाठी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची आहे. विहीर बांधल्यामुळे बागायती शेती करणे शक्य होईल. इतरही कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा. पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी. डिसेंबरअखेर सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण होईल, असे नियोजन करावे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बांधकामासाठी प्रस्ताव सादर करावा.

Web Title: Give priority to construction of wells in the banks of Narmada- Dr. Rajendra Bharud