केवलापाणी येथे गिम्बदेव पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:55+5:302021-03-27T04:31:55+5:30

साेमावल : जिल्ह्यात माघ अमावस्येपासून होळीपर्व सुरू होते. महिनाभर साजरा होणाऱ्या या उत्सवात गिम्बदेव पूजनाला मोठे महत्त्व आहे. ...

Gimbadev Pujan at Kevalapani | केवलापाणी येथे गिम्बदेव पूजन

केवलापाणी येथे गिम्बदेव पूजन

साेमावल : जिल्ह्यात माघ अमावस्येपासून होळीपर्व सुरू होते. महिनाभर साजरा होणाऱ्या या उत्सवात गिम्बदेव पूजनाला मोठे महत्त्व आहे. यंदा तळोदा तालुक्यातील केवलापाणी येथे गिम्बदेव पूजन साध्या पद्धतीने करण्यात आले.

केवलापाणी येथील पुजारा सोन्या पाडवी, पोलीस पाटील कुवरसिंग पाडवी, हांजा पाडवी, दिलीप पाडवी, बोण्डा पाडवी, मेथा पाडवी, कालूसिंग नाईक, गुलाबसिंग पाडवी यांच्यासह ग्रामस्थांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात आले.

सातपुड्यात महिनाभर चालणारा होळीपर्व हा गिम्बदेव महिना नावाने ओळखला जातो. होळी उत्सवाच्या आधी गिम्बदेव पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आख्यायिकेप्रमाणे बाप गिम्बदेव व आई फुलहारदेवी यांची कन्या असलेल्या होळी मातेच्या पर्वाला गिम्बदेव व फुलहरीदेवी यांच्या पूजन उत्सवाने सुरुवात होत असते. प्रथम नियोजित पुजाऱ्यामार्फत होळीसाठी गोवऱ्यासह सागाचा दांड गिम्बदेवाच्या नावाने १५ दिवस अगोदर रोवला जातो. गिम्बदेव पूजेत फुलहरीदेवी पूजनाला अत्यंत महत्व दिले जाते. फूल आणि हार म्हणजेच प्रतीकात्मक स्वरूपात होळीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येत असलेला हार-कंगन असा अभिप्रेत अर्थ प्रचलित आहे.

Web Title: Gimbadev Pujan at Kevalapani