शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस व ऑनलाईन रेशनकार्ड नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पं.दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 15 ऑगस्टपयर्ंत अंत्योदय व प्राधान्य योजनेतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पं.दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 15 ऑगस्टपयर्ंत अंत्योदय व प्राधान्य योजनेतील पात्र लाभाथ्र्यांची गॅस जोडणी व ऑनलाईन रेशनकार्ड नोंदणी करण्यात येणार येत आहे. अभियानांतर्गत या दोन्ही योजनेतील सर्व लाभाथ्र्यांना धान्य व रेशनकार्ड वाटप करण्यात येणार आहे.अभियानांतर्गत ग्रामीण भागात 44 हजार व शहरी भागात 59 हजारापेक्षा कमी उत्पन्न असणा:या कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेत अन्नधान्याचा व विस्तारीत उज्वला योजनेत गॅस कनेक्शनचा लाभ देण्यात येणार आहे. 30 जून 2019 अखेर पात्र कार्डधारकांची स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत नोंदणी करण्यात येणार आहे. उज्वला गॅस योजनेसाठी लाभाथ्र्यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे नोंदणी करावयाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक कार्डधारकांच्या घरी भेट देऊन आधार क्रमांक पीओएस मशिनमध्ये नोंदविणार आहे. यासाठी नागरिकांनी रेशन कार्डातील व्यक्तींची आधार नोंदणी करून घ्यावी. कार्डधारक व त्यांचे कुटुंबिय गावी रहात नसल्यास असे कार्ड कमी करण्यात येणर आहेत. कुटुंबाकडे गॅस कनेक्शन असल्याबाबतही यात नोंद घेण्यात येणार असून गॅस कनेक्शन नसलेल्या पात्र लाभाथ्र्यांकडून विस्तारीत उज्वला योजनेचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. या अर्जासोबत रेशन कार्डाची ङोरॉक्स प्रत, बँक पासबूक खाते क्रमांक प्रत, कुटुंबप्रमुख महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत जोडावा लागणार आहे. पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेतून वंचित रहाणार नाहीत याच्या सुचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. अपात्र लाभाथ्र्यांना लाभ मिळू नये याबाबतदेखील दक्षता घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली नोंदणी रास्त धान्य दुकानदाराकडे करून घ्यावी. आधार नोंदणी कार्डातील व्यक्तींशी संलग्न केली नसल्यास त्वरीत आधार नोंदणीदेखील करून घ्यावी. नोंदणीत समस्या असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.