गणेशने आधी तरुणीसोबत संबंध ठेवले, तसले व्हिडीओ बनवले; वाद झाला आणि सगळे व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:27 IST2026-02-03T19:24:36+5:302026-02-03T19:27:28+5:30

२७ वर्षीय गणेश नावाच्या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबध होते. त्याने तिच्यासोबत अनेकवेळा शरीरसंबंध ठेवले. त्याचे व्हिडीओही शूट केले, फोटो काढले होते. 

Ganesh had a relationship with a young woman before, made a video of it; there was an argument and all the videos... | गणेशने आधी तरुणीसोबत संबंध ठेवले, तसले व्हिडीओ बनवले; वाद झाला आणि सगळे व्हिडीओ...

गणेशने आधी तरुणीसोबत संबंध ठेवले, तसले व्हिडीओ बनवले; वाद झाला आणि सगळे व्हिडीओ...

तरुणीसोबत जवळीक साधून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यासोबत अश्लील व्हिडीओ शूट केले. फोटोही काढले. पण, त्यांच्यात वाद झाला आणि आरोपी गणेशने फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. या प्रकरणी तरुणास शहादा व म्हसावद पोलिसांनी रविवारी अटक केली. नंदुरबार जिल्ह्यात ही घटना घडली. 

गणेश भोग्या पावरा (२७), रा. बोरफळी असे त्याचे नाव आहे. पीडित मुलगी व गणेश याची एका कार्यक्रमात भेट झाली होती. भेटीनंतर मोबाईल नंबर घेतल्याने संपर्क वाढला. 

त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गणेश पावरा याने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात त्याने तिचा शारीरिक छळ केल्याचाही आरोप आहे. 

शरीरसंबंधांचे व्हिडीओ आणि फोटो

एवढ्यावर न थांबता त्याने अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करून फोटोदेखील काढले. हळूहळू त्यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाला. यानंतर संशयित गणेश याने युवतीला व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. 

त्यानंतरही तीने दुरावा कायम ठेवला. त्यामुळे चिडून त्याने व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून दमदाटी केली. तरुणीने पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्याला भेटून हा प्रकार सांगितला. नंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले. त्याचे मोबाइल लोकेशन पाहून त्याचा पाठलाग करीत त्याला शिरपूर बसस्थानकावर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Web Title: Ganesh had a relationship with a young woman before, made a video of it; there was an argument and all the videos...