शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्वच्छता अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात स्वच्छता अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात १०० टक्के शौचालय बांधकाम करून तालुका हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी गावागावांत जनजागृती करून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामुळे बऱ्याच प्रमाणात हगणदारीमुक्त अभियानाला यश मिळाल्याचे दिसत होते; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनामुळे या अभियानाकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने तालुक्यात हगणदारीमुक्तीसह स्वच्छतेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. शासनाने अनेकवेळा  ‘स्वच्छतेकडून सुरक्षितते’कडे असे घोषवाक्य देऊन गावे किती स्वच्छ केली. परंतु जी गावे स्वच्छ व हगणदारीमुक्त झालेली आहेत त्या गावांतील परिस्थिती सध्या विदारक असून, हीच का ती स्वच्छ व हगणदारीमुक्त गावे, असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अनेक  गावांत शौचालय निर्माण झाले खरे, परंतु त्याचा वापरही योग्य पद्धतीने होत  नसून, नागरिक उघड्यावर शौचास जाण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

अनेक गावांत अभियान नावापुरतेचअनेक गावांमध्ये हे अभियान केवळ नावापुरतेच राबविले जात असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागात गावामध्ये प्रवेश करताक्षणीच अस्वच्छतेचे दर्शन होते.  ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहिती आहे, असे असताना तेसुद्धा याकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता अभियानात प्रशासनासह नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागल्यास गावात स्वच्छता राहून विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.