म्हसावद ते सुलतानपूर रस्त्यासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:39+5:302021-02-14T04:29:39+5:30

शहादा ते खेतिया रस्त्याचे ब्राम्हणपुरी गावाजवळ महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना गावातील कमी रुंदीच्या ...

Funding sanctioned for Mhaswad to Sultanpur road | म्हसावद ते सुलतानपूर रस्त्यासाठी निधी मंजूर

म्हसावद ते सुलतानपूर रस्त्यासाठी निधी मंजूर

शहादा ते खेतिया रस्त्याचे ब्राम्हणपुरी गावाजवळ महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना गावातील कमी रुंदीच्या रस्त्यामुळे शहादा व खेतिया मार्गाने होणारी अवजड वाहतूक म्हसावद ते सुलवाडा-सुलतानपूर या रस्त्यावर वळविण्यात आली होती. तथापि, हा रस्ता राज्यमार्गाप्रमाणे अवजड वाहतुकीच्या क्षमतेचा नव्हता. तसेच पावसाळा चालू होता त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम मंजूर होते. त्या कामाच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे ही निविदा चारवेळा काढूनही ठेकेदारांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोरानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार मार्च २०१९ नंतर कार्यरंभ आदेश न देण्यात आलेली कामे रद्द करण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्यात आला असून येत्या १० ते १२ दिवसात निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर व निविदा निश्चित झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली.

Web Title: Funding sanctioned for Mhaswad to Sultanpur road