इंधन बचतीमुळे वाटू लागली भारी ई-बाईक ठरतेय शान की सवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:37 PM2020-08-14T12:37:41+5:302020-08-14T12:37:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसेंदिवस होणारी इंधन दरवाढ नागरिकांना वाहतूकीसाठी पर्याय साधनांचा शोध घेण्यास बाध्य करत आहे़ यात ...

Fuel savings have made it seem like a huge e-bike ride | इंधन बचतीमुळे वाटू लागली भारी ई-बाईक ठरतेय शान की सवारी

इंधन बचतीमुळे वाटू लागली भारी ई-बाईक ठरतेय शान की सवारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवसेंदिवस होणारी इंधन दरवाढ नागरिकांना वाहतूकीसाठी पर्याय साधनांचा शोध घेण्यास बाध्य करत आहे़ यात शहरी भागात अचानक ई-बाईक वापरा ट्रेंड वाढत असून गल्लोगल्लो छोट्या-छोट्या ईबाईक्स वापरणारे दिसून येत आहेत़ विशेष बाब म्हणजे गेल्या चार महिन्यात या बाईक्सचा खप वाढला आहे़
नंदुरबार शहरात प्रामुख्याने ईलेक्ट्रॉनिक बाईक अर्थात बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींचे विक्रेते आहेत़ लॉकडाऊपूर्वी महिन्याकाठी एखाद-दोन दुचाकी विक्री होत होत्या़ दोन महिने बाजारपेठा बंद होत्या़ दरम्यान जूनपासून बाजारपेठा काही अंशी खुल्या झाल्यानंतर ई-बाईक्स विक्रीही सुरू झाली होती़ यादरम्यान पेट्रोलचे वाढते दर आणि लॉकडाऊनमुळे बंद होणारे पेट्रोलपंप यावर पर्याय म्हणूून अनेकांनी ईलेक्ट्रीक बाईक घेण्याचा निर्णय घेत तो पूर्णही केला़ यातून दोन महिन्यात शहरातील विक्रेत्यांकडून १५० बाईक्स विक्री झाल्या आहेत़ या बाईक्स प्रामुख्याने शहादा आणि नंदुरबार या दोन शहरांमध्ये विक्री झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ चालवण्यास हलकी आणि वेग कमी असल्याने अपघातांचा धोका कमी असल्याने ग्राहक या बाईक्सला पसंती देत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ साधारण एकदा चार्ज केल्यावर ६० किलोमीटरपर्यंत धावणाºया या अनोख्या वाहनांचा उपयोग नागरीक बाजारपेठेत येण्या-जाण्यासाठी करत असल्याचे दिसून आले आहे़ याबाबत शहरातील विक्रेते मोहन श्रॉफ यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, या वाहनांची मागणी वाढली आहे़ पासिंग आणि लायसन्सची अडचण नसल्याने तसेच वाढलेले इंधन दरवाढ झाल्याने नागरिक ई-बाईक्सची खरेदी करत आहेत़

दरम्यान ई बाईक चार्जिंगसाठी मात्र शहर किंवा जिल्ह्यात एकही चर्जिंग स्टेशन नाही़ ई-बाईक्ससोबत ई-रिक्षांची संख्या शहरात आहे़ नागरिक घरच्याघरीच चार्जिंग घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़

Web Title: Fuel savings have made it seem like a huge e-bike ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.