शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

जखमी भावाला रुग्णालयात पाहण्यासाठी गेलेल्या युवकासह मित्राचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

नीलेश रमेश गावीत व लाजरस गावीत, रा.रायपूर, ता.नवापूर असे मयत युवकांची नावे आहेत. नवापूर तालुक्यातील घोडजामणे गावानजीक याकुब गावीत ...

नीलेश रमेश गावीत व लाजरस गावीत, रा.रायपूर, ता.नवापूर असे मयत युवकांची नावे आहेत. नवापूर तालुक्यातील घोडजामणे गावानजीक याकुब गावीत यांचा शनिवारी अपघात झाला. त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला पाहण्यासाठी त्याचा भाऊ नीलेश गावीत व मित्र लाजरस गावीत हे नवापूर रुग्णालयात आले होते. त्यानंतर रुग्णालयातून घरी परत जात असताना सुरतकडून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एनएल ०१-एई ३३१८) वीज वितरण कंपनी समोर युवकांच्या मोटारसायकलीला (क्रमांक एमएच ३९ एई ४६७३) जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. नवापूर शहरातील महामार्गनजीक असलेले दुकानदार व नागरिक व युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा अपघातग्रस्तांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर दोघांना व्यारा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. नीलेश गावीत याचा रस्त्यातच तर लाजरस गावीत याचा उपचार घेतांना मृत्यू झाला. दुपारी नीलेश गावीत यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. एकाच गावातील दोन युवकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रायपूर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. नवापूर पोलिसांनी ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. सहचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

महामार्गावर गतिरोधकाची मागणी

नवापूर शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूस ६-७ फूट खड्डे करून ठेवले आहे. अरुंद महामार्ग झाल्याने भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढेल आहे. पूर्वीप्रमाणे नवापूर उपजिल्हा रुग्णालय जवळ व प्रवेशद्वारानजीक गतिरोधक बसण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आपल्याच कार्यालयासमोर मृत्यू

रायपूर येथील नीलेश रमेश गावीत गेल्या काही वर्षांपासून वीज वितरण कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होता. त्याच कार्यालयासमोर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेचे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी तत्काळ घटनास्थळी पोलीस रवाना केले. अपघातग्रस्त ट्रक व सहचालकाला अटक करण्यात आली. या दरम्यान सहचालकाला जमावाने बेदम मारहाण केल्याने त्यालादेखील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.