शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा शहरातील चार ट्रान्सफाॅर्मर्स बंद पडल्याने दाटला अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

शहरातील इंदिरानगर भागातील डॉ. बंगाली यांच्या घरासमोर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, अस्लम हॉस्पिटलचे, तसेच बर्फ कारखाना परिसरात एक, असे ...

शहरातील इंदिरानगर भागातील डॉ. बंगाली यांच्या घरासमोर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, अस्लम हॉस्पिटलचे, तसेच बर्फ कारखाना परिसरात एक, असे चार ट्रान्सफाॅर्मर्स बंद पडले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून हे रोहित्र बंद आहे. लाॅकडाऊनमुळे नागरिक घरीच आहेत. यातून तापमानाचा पारा चाळिशी पार गेला आहे. परिणामी विजेअभावी पंखे व कूलर बंद पडत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात डास आणि उकाडा यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. अक्कलकुवा शहरात वीज कंपनीचा कारभार अत्यंत ढिला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एखादा ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाल्यास त्याची १० दिवसांपर्यंत दुरुस्ती करण्यात येत नसल्याची माहिती आहे. शहरात एखादा ट्रान्सफाॅर्मर्स नादुरुस्त झाल्यास इतरांवर लोड पडून तेही नादुरुस्त होत असल्याचे प्रकार होऊनही संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती असूनही कंपनीकडून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या सीतानगर, इंदिरानगर, बच्चूभाई कॉलनी आदी परिसरात नर्मदा कॉलनीच्या ट्रान्सफाॅर्मरवरून वीज पुरवठा होत आहे; परंतु या लाइनवरही वीज चोरटे आकडे टाकत असल्याने वारंवार फ्यूज उडत आहे. शहरातील सर्व ट्रान्सफाॅर्मर्स १०० किलो व्हॅट क्षमतेची आहेत. त्यामुळे ते नादुरुस्त झाल्यास त्या जागी दुसरे रोहित्र त्वरित मिळत नाही. सध्या अक्कलकुवा येथे एकही रोहित्र शिल्लक नसल्याने शहादा येथील वरिष्ठ कार्यालयातून रोहित्रांची मागणी केली आहे. मात्र, तेथेही १०० किलो व्हॅट क्षमतेचे रोहित्र शिल्लक नसल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे. यामुळे अक्कलकुव्वा अंधारातच राहण्याची शक्यता आहे.