शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा पराभव करुन चौघे परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:36 IST

नंदुरबार : कोरोनाचा पराभव करुन नंदुरबारातील चौघे आज घरी परतले़ चौघा बाधितांना सिव्हीलच्या आयोसोलेशन वॉर्डातून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला ...

नंदुरबार : कोरोनाचा पराभव करुन नंदुरबारातील चौघे आज घरी परतले़ चौघा बाधितांना सिव्हीलच्या आयोसोलेशन वॉर्डातून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला आहे़ यावेळी रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़४८ वर्षीय पुरुष, युवक, युवती आणि वृद्ध महिला अशा चौघांना निरोप देण्यात आला आहे़ बुधवारी या चौघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला होता़ त्यानुसार त्यांना डिस्चार्ज करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता़ सकाळी चौघांना कक्षातून बाहेर आणल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले़ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ के़डी़सातपुते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ चौघांनी जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांनी घरी राहून कोरोनासोबत मुकाबला करावा असे बाहेर पडताना सांगितले़

‘सबके लिए दुवा करेंगे’

’ नंदुरबार शहरातील चौघे कक्षातून बाहेर आल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला़ यावेळी वृद्ध महिलेने संपूर्ण जग कोरोनामुक्त व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करणार असल्याचे सांगून सर्वांनी काळजी घ्यावी असे सांगितले़’ चौघेही एकाच कुटूंबातील असल्याची माहिती असून त्यांना १८ एप्रिलपासून क्वारंटाईन कक्षात आणण्यात आले होते़ याठिकाणी तीनवेळा स्वॅब नमुने तपासणी करुन त्याच्या अहवालाची पडताळणी करुन सर्वांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़’ दरम्यान जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनानेही आरोग्य विभागाचे कौतूक केले असून चौघे कोरोनामुक्त झाल्याने शहरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे़