शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत पिता-पूत्रासह चारजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

उमेश शांतीलाल चव्हाण (२९) रा.तळोदा, मदन दिवल्या नाईक(४५), अमित मदन नाईक (१२), दारासिंग छगन जांभोरे (४५) रा.सर्व तुलाजा ता. ...

उमेश शांतीलाल चव्हाण (२९) रा.तळोदा, मदन दिवल्या नाईक(४५), अमित मदन नाईक (१२), दारासिंग छगन जांभोरे (४५) रा.सर्व तुलाजा ता. तळोदा असे मयतांची नावे आहेत. तर पूजा उमेश चव्हाण, सुनंदा शांतिलाल चव्हाण हे जखमी झाले.

पोलीस सूत्रांनुसार, उमेश चव्हाण, पूजा चव्हाण, सुनंदा चव्हाण रा. तळोदा हे मोटार सायकलीने (क्रमांक एम एच ३९.एल ४८४) बोरदहून येत होते. त्या दरम्यान मदन नाईक, अमित नाईक, दारासिंग जांभोरे (४५) रा.सर्व तुलाजा ता. तळोदा हे मोटार सायकलीने (क्रमांक एम एच १५ डी टी ६३४०) तलोद्याहून बाजार करून तुळजा येथे जात होते. भरधाव असलेल्या दोन्ही दुचाकींची तळव्यानजीक समोरासमोर धडक झाली.

चार जणांना डोके, हात पायांना प्रचंड मार बसल्याने उमेश, मदन, अमित, दारासिंग हे चार जण जागीच ठार झाले. तर सुनंदा शांतीलाल चव्हाण,पूजा चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील सुनंदा याना गंभीर मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघात एवढा भीषण होता की तेथे रक्ताचा सडा पडलेला होता. गावकऱ्यांनी पोलिसांना कळविल्या नंतर पोलिस दाखल झाले. उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्ण वाहिकेतून सर्वांना तळोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बाबत पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार महिन्यापूर्वीच उमेश याचा विवाह झाला होता. आपल्या काकाकडे बोरद येथून आई, पत्नीसह मोटार सायकल ने तलोद्याला येत होता. तर मदन नाईक हे देखील आपल्या १२ वर्षाचा मुलगा व आणखी एकाजणासह येत होते. त्यात पीता-पूत्र जागीच ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत होते.