जीटीपी महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांना चार सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:31 IST2019-12-18T12:31:09+5:302019-12-18T12:31:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत वार्षिक प्रशिक्षण शिबीरात जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना एककातील ...

Four gold for GTP college students | जीटीपी महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांना चार सुवर्ण

जीटीपी महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांना चार सुवर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत वार्षिक प्रशिक्षण शिबीरात जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना एककातील छात्र सैनिकांनी विविध उपक्रमात चार सुवर्ण पदके व बेस्ट कंपनी अवॉर्ड मिळाला.
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या जी.टी.पाटील महाविद्यालयाचे छात्रसैनिकांनी अमळनेर येथे झालेल्या ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत वार्षिक प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेतला. या शिबीरात महाविद्यालयातील १६ छात्रसैनिकांनी चार्ली कंपनीचे प्रतिनिधीत्त्व केले. या शिबीरात धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्ह्यातील एकुण ४०० छात्रसैनिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी जी.टी.पाटील महाविद्यालयाचा छात्रसैनिक सिनिअर अंडर आॅफीसर श्रेय महेश रेखी याने सांस्कृतिक कार्यक्रमात सोलो डान्स प्रकारात तसेच बेस्ट कॅम्प सिनिअर म्हणून असे एकुण दोन सुवर्ण पदक प्राप्त केले. प्रतिक माधव कदम याने बासुरी वाद्य प्रकारात व बेस्ट कंपनी सिनिअर म्हणून एकुण दोन सुवर्ण पदक पटकाविले. यशस्वी छात्रसैनिकांचा ४९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेरचे कमांडींग आॅफीसर लेफ्ट. कर्नल जगमितसिंग व मनोज रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस. रघुवंशी, प्राचार्य व्ही.एस.श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, डॉ. महेंद्र रघुवंशी, प्रा.ए.के. शेवाळे, एनएसएस अधिकारी डॉ.अमोल भुयार, डॉ.माधव कदम, प्रा.उपेंद्र धगधगे यांनी कौतुक केले. या छात्रसैनिकांना महाविद्यालयातील लेफ्ट.डॉ.विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Four gold for GTP college students