बिबट्याने केल्या चार शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:49 IST2020-09-02T13:49:40+5:302020-09-02T13:49:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा येथील जुना उटावदकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या ...

Four goats killed by a leopard | बिबट्याने केल्या चार शेळ्या फस्त

बिबट्याने केल्या चार शेळ्या फस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा येथील जुना उटावदकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या शेताच्या बांधावर रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान बिबट्याने चार शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. बिबट्याचे वाढते हल्ले चिंताजनक झाले असून वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
रविवारी दुपारी गोविंद अशोक पाडवी हे आपल्याकडील आठ-दहा शेळ्या घेऊन उटावद शिवारात चारण्यासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास त्याने शेळ्या चरण्यासाठी सोडल्या व एका झाडाच्या आडोशाला जाऊन बसला. तीन वाजेच्या सुमारास सोमसिंग रघुनाथ पाडवी व अरुण वाणी यांच्या शेताच्या बांधावर बिबट्याने कळपावर हल्ला चढवला. त्यात चार शेळ्या फस्त केल्या. घडलेला प्रकार रखवालदार कालूसिंग बबन वळवी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या एक शेळी बाजूच्या उसाच्या शेतात ओढून नेण्यात यशस्वी ठरला. याबाबत वनविभागाला वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क झाला नाही. या बिबट्यास तात्काळ जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील आठवड्यात बिबट्याने याच परिसरात हातोडा रस्त्यावरील चंदनवेली परिसरात मानवी वस्तीत दर्शन दिले होते. मागील आठवडाभरापासून अमरधाम परिसरातही बिबट्या वेळोवेळी निदर्शनास आला आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावलेला आहे. मात्र पिंजºयात शिकार न ठेवल्यामुळे बिबट्याने पिंजºयाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना वनविभाग मात्र निद्रावस्थेत आहे. घटनेनंतर कार्यवाही करण्यापेक्षा हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नये, त्यांना जंगलातच सुरक्षितता वाटावी, अशा उपाययोजनांकडे वनविभााने दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपाययोजनांसाठी वनविभाग अजून किती बळींची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Four goats killed by a leopard