शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या आश्वासनानंतर माजी सरपंचांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पाअंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ...

आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पाअंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायतीने विकास कामे केली. त्यात चार दुहेरी सोलर पंपचे कामाचे १४ लाख आठ हजार ६९६, पाणीटंचाई निवारणार्थ १० हातपंपांचे पाच लाख ४४ हजार १८० व सन २०१६-१७ या वर्षातील सहा रस्त्यांच्या कामाचे २३ लाख दोन हजार रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले. या तिन्ही कामांची एकूण रक्कम ४२ लाख ५४ हजार ८७६ रुपयांची रक्कम थकीत असून अद्यापपर्यंत मिळालेली नाही. ही रक्कम मिळावी म्हणून कुकडीपादरचे माजी सरपंच सांगल्या वसावे यांनी तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याकडे निवेदने देऊन वारंवार चकरा मारूनही ही रक्कम मिळालेली नाही. अखेर वसावे यांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांच्याकडील २४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये अनुक्रमे दोन कोटी २३ लाख ४५ हजार ६७व ३१ लाख ७३ हजार ३२७ रुपयांचा निधी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. आपण उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे पत्र तहसीलदार अककलकुवा यांच्यातर्फे नायब तहसीलदार राजेश अमृतकर यांनी उपोषणकर्ता वसावे यांना दिल्यावर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या मजुरांना व गवंडी यांना अद्यापपर्यत मजुरी न मिळाल्याने उपोषणास बसलेल्या सांगल्या वसावे यांना पाठींबा देण्यासाठी कंजाला येथील रामसिंग दुधल्या वळवी यांनीही अककलकुवा तहसीलदार यांना पत्र दिले.

अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर उपोषणास सकाळी बसलेले कुकडीपादरचे माजी सरपंच सांगल्या वसावे दुपारी तीन वाजेपर्यंत तळोदा प्रकल्पाअंतर्गत संबधित अधिकारी किंवा कुणीही कर्मचाऱ्यांनी भेट देऊन साधी विचारपूसही केली नसल्याची खंत उपोषणकर्ते सांगल्या वसावे यांनी व्यक्त केली. या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विचारपूस केल्याचे त्यांनी सांगितले.