शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या बंदोबस्तकडे वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा/प्रतापपूर : मानवी वसाहतींकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात धवळीविहीर, प्रतापपूर व रांझणी या गावांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा/प्रतापपूर : मानवी वसाहतींकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसात धवळीविहीर, प्रतापपूर व रांझणी या गावांमध्ये बिबटय़ाने पाळीव पाण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे. या बिबटय़ाच्या बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे, परंतु वन विभागामार्फत या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सातपुडय़ातील वन्यप्राणी वारंवार तळोदा तालक्यातील मानवी वसाहतींमध्ये शिकारीचा शोधात धाव घेत आहे. त्यात प्रमाुख्याने बिबटय़ाचा अधिक वावर असल्याचे दिसून येत आहे. या बिबटय़ाने रांझणी येथील शरद निंबा मराठे यांच्या मेंढपाळ तानू मानू भापकर हे मेंढय़ांसह वास्तव्यास होते. बिबटय़ाने मेंढय़ांच्या कळपावर हल्ला करीत दोन मेंढय़ा फस्त केल्या. यापूर्वी प्रतापपूर येथील विजय पाटील, छोटू पावरा, राजाराम गुंजाळे यांच्या पाळीव पाण्यांवर बिबटय़ाने हल्ला करीत त्यांना ठार केले. मेंढय़ांवरील हल्ल्यांशिवाय 26 नोव्हेंबर रोजी धवळीविहीर ता.तळोदा येथील जयसिंग रतिलाल पावरा हे गुरे चारुन घराकडे येत असताना बिबटय़ाने पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत त्यांना ठार केले. रांझणी  व धवळीविहीर या दोन्ही घटनांचा वनविभागामार्फत पंचनामे देखील करण्यात आले. रांझणी येथी नुकसानीचा पंचनामा वनपाल एन.पी.पाटील, वनरक्षक एल.टी.पावरा यांनी केला तर धवळीविहीर येथील नुकसानीचा देखील पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंचनामा करतांना दोन्ही ठिकाणच्या नुकसानग्रस्तांसह नागरिकांमार्फत बिबटय़ाच्या बंदोबस्तसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकररडे वन विभागामार्फत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पशुपालकांसह नागरकांमार्फत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बिबटय़ाच्या भितीमुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील शेतीची कामांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. ही कामे वेळोवर पूर्ण करण्यासाठी वन विभागामार्फत तालुक्यात ठिकठिकाणी पिजरे लावण्यात यावे, अशी मागणी पुन्हा करण्यात येत  आहे. वन विभागामार्फत बिबटय़ाच्या बंदोबस्त न झाल्यास वन विभागाविरुद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. अशा घटना तळोदा तालुक्यात वारंवार घडत असल्यामुळे यंदाच्या मागणीनपुसार वन विभागामार्फत कुठली भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.